अप्पा लोंढे खूनप्रकरणी तिघांना अटक

By admin | Published: June 30, 2016 01:23 AM2016-06-30T01:23:30+5:302016-06-30T01:23:30+5:30

कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (वय ५३, रा. उरुळी कांचन) याच्या खून प्रकरणात लोणी-काळभोर पोलिसांनी तिघांना अटक केली.

Appa Londhe murder case: Three arrested | अप्पा लोंढे खूनप्रकरणी तिघांना अटक

अप्पा लोंढे खूनप्रकरणी तिघांना अटक

Next


पुणे : कुख्यात गुंड अप्पा ऊर्फ प्रकाश हरिभाऊ लोंढे (वय ५३, रा. उरुळी कांचन) याच्या खून प्रकरणात लोणी-काळभोर पोलिसांनी तिघांना अटक केली. याअगोदर पोलिसांनी ११ जणांना अटक केली असून त्यांच्या संघटित गुन्हेगारी कायदा (मोक्का) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे़
अण्णा ऊर्फ बबड्या किसन गवारे (वय ३५, रा. मेमाणेवाडी, ता. दौंड), प्रमोद ऊर्फ बापू काळुराम कांचन (वय ३७), सोमनाथ काळुराम कांचन (वय ४२, दोघेही रा. उरूळी कांचन) अशी त्यांची नावे आहेत़
गोरक्ष बबन कानकाटे (वय ४३, रा़ कोरेगाव, ता़ हवेली), रवींद्र शंकर गायकवाड (वय ३६, रा. उरुळी कांचन), संतोष भीमराव शिंदे (वय ३४), नीलेश खंडू सोलणकर (वय ३०), राजेंद्र विजय गायकवाड (वय २४), आकाश सुनील महाडिक (वय २०), नितीन महादेव मोगल (वय २७), विष्णू यशवंत जाधव (वय ३७), नागेश लक्ष्मण झाडकर (वय २७) आणि मनी कुमार ऊर्फ चंद्रा ऊर्फ अण्णा (वय ४५), विकास प्रभाकर यादव (वय ३१) यांना यापूर्वी लोणी काळभोर पोलिसांनी अटक केलीे.
या गुन्ह्याचा तपास करण्यासाठी तिघांना पोलीस कोठडी द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. याला बचाव पक्षाचे वकील सुचित मुंदडा, अ‍ॅड. दादासाहेब लोंढे, अ‍ॅड. केतन जाधव, अ‍ॅड. दीपाली गायकवाड यांनी विरोध केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून विशेष मोक्का न्यायाधीश ए. जी. बिलोलीकर यांनी त्यांना ५ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला. (प्रतिनिधी)
आश्रय देणाऱ्याचा घ्यायचाय शोध
अप्पा लोंढे हा २८ मे २०१५ रोजी पहाटे व्यायामाकरिता बाहेर पडला़ तेव्हा उरुळी कांचन येथे त्याच्यावर आरोपींनी गोळीबार व धारदार शस्त्रांनी वार करून खून केला. तेव्हापासून हे तिघे फरार होते़ या तिघांना बुधवारी न्यायालयात हजर करण्यात आले़ विशेष सरकारी वकील विकास शहा यांनी सांगितले, की त्यांना फरार कालावधीत कोणी आश्रय दिला़ आणखी फरार आरोपीचाही शोध घ्यायचा आहे, विलास लोंढे खून प्रकरणात गोरख कानकाटे, रवींद्र गायकवाड, अण्णा गवारे, प्रमोद कांचन, सोमनाथ कांचन यांना शिक्षा झाली असून तो खटला उच्च न्यायालयात प्रलंबित आहे़

Web Title: Appa Londhe murder case: Three arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.