लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी घरीच साजरी करा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 28, 2020 07:48 PM2020-07-28T19:48:43+5:302020-07-28T19:50:25+5:30

सारसबाग येथे अभिवादन करण्यासाठी येऊ नये.

Appeal to celebrate the birth centurey of Lokshahir Annabhau Sathe in home | लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी घरीच साजरी करा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन 

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जन्मशताब्दी घरीच साजरी करा: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवाहन 

googlenewsNext
ठळक मुद्देपोलीस व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने आवाहन

पुणे : साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची १ ऑगस्ट रोजी जन्मशताब्दीनिमित्त नागरिकांनी अभिवादन करण्यासाठी सारसबाग येथे एकत्र न येता घरीच जयंती साजरी करावी, असे आवाहन शहर पोलीस व साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, शताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 
लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन करण्यासाठी दरवर्षी १ ऑगस्टला मोठ्या संख्येने नागरिक सारसबाग येथे जमत असतात. सध्या कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला असल्याने शहरात प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सर्व सार्वजनिक कार्यक्रमांना बंदी घालण्यात आली आहे. १ ऑगस्ट रोजी कोणीही सारसबाग या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यासाठी येऊ नये. शताब्दी जयंती महोत्सव समितीच्या वतीने १ ऑगस्टला सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत मोजक्या लोकांच्या उपस्थितीत पुष्पहार अर्पण व अभिवादनाचा कार्यक्रम पार पडणार आहे. तसेच २९ जुलै ते ५ ऑगस्ट दरम्यान दररोज सायंकाळी ४ ते ६ या वेळेत सोशल मिडिया व वेबिनार च्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्यात येणार आहे. तरी सर्वांनी जयंती घरीच साजरी करुन पोलीस व प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नायकवडी यांनी केले आहे.

Web Title: Appeal to celebrate the birth centurey of Lokshahir Annabhau Sathe in home

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.