अर्धा तास अगोदरच मतदार केंद्रात हजर; शिवाजीनगरमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा

By प्रशांत बिडवे | Published: November 20, 2024 02:03 PM2024-11-20T14:03:42+5:302024-11-20T14:04:22+5:30

पहाटेच्या वेळी माॅर्निंग वाॅक साठी बाहेर पडलेल्या असंख्य नागरिकांनी घरी परतत असतानाच केंद्रावर जात मतदान केल्याचे चित्र दिसून आले

Appear at the polling station half an hour before; Queues of voters in Shivajinagar since morning | अर्धा तास अगोदरच मतदार केंद्रात हजर; शिवाजीनगरमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा

अर्धा तास अगोदरच मतदार केंद्रात हजर; शिवाजीनगरमध्ये सकाळपासूनच मतदारांच्या रांगा

पुणे : शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघासाठी मतदान प्रक्रिया सकाळी सात वाजता सुरू हाेताच डेक्कन परिसरातील आपटे रस्ता, भांडारकर रस्ता, शिवाजीनगर परिसरातील नागरिकांनी उत्साहात सुरूवात झाली. मात्र, झाेपडपट्टी भागातही मतदान केंद्रांवरही सकाळच्या सत्रांत नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र दिसून आले. सकाळी उत्साहात सुरू झालेल्या मतदानाचा वेग दुपारी थाेडासा मंदावल्याचे दिसून आले.

सकाळी दहा नंतर वाढत जाणारी गर्दी आणि उन्हाचा पारा यामुळे शिवाजीनगर नगर मतदारसंघातील लक्ष्मणराव आपटे प्रशाला, केंद्रावर सकाळी साडेसहा वाजल्यापासून नागरिक मतदान करण्यासाठी हजेरी लावली हाेती. सकाळी सात वाजता केंद्र सुरू हाेताच नागरिकांच्या रांगा लागल्याचे चित्र हाेते.

‘माॅर्गिंग वाॅक’हून परतानाच मतदान

पहाटेच्या वेळी माॅर्निंग वाॅक साठी बाहेर पडलेल्या असंख्य नागरिकांनी घरी परतत असतानाच केंद्रावर जात मतदान केल्याचे चित्र डेक्कन परिसरातील अनेक मतदान केंद्रावर दिसून आले.

अर्धा तास अगाेदर मतदान केंद्रावर पाेहाेचलाे

हाॅटेल मॅनेजमेंट महाविद्यालयांत शिक्षक असलेले धनराज कालगी यांनी आपटे रस्त्यावरील लक्ष्मणराव आपटे प्रशालेतील मतदान केंद्रावर सर्वप्रथम मतदान केले. केंद्रावर पहिल्यांदा मतदान करायला संधी मिळावी यासाठी ते सकाळी साडेसहा वाजता केंद्रावर पाेहाेचले हाेते. कालगी म्हणाले, ‘ आज सुटी असली तरी दिवसभर इतर कामे करायला वेळ मिळताे विशेष म्हणजे दिवसा गर्दीत थांबावे लागू नये यासाठी लवकर येउन मतदान करताे. याप्रकारे लवकर येउन मतदान करण्याची ही माझी तिसरी वेळ आहे’ असेही त्यांनी सांगितले. फाेटाे आहे.

Web Title: Appear at the polling station half an hour before; Queues of voters in Shivajinagar since morning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.