लाॅकडाऊन होईल म्हणून बाजापेठांना जत्रेचे स्वरूप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:09 AM2021-04-13T04:09:07+5:302021-04-13T04:09:07+5:30
वानवडीमध्ये सोमवारी सकाळपासूनच रस्त्यांवर वर्दळ वाढली होती. किराणा मालाची दुकाने, भाजीपाला तसेच इतर आवश्यक गोष्टी घेण्यासाठी नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी ...
वानवडीमध्ये सोमवारी सकाळपासूनच रस्त्यांवर वर्दळ वाढली होती. किराणा मालाची दुकाने, भाजीपाला तसेच इतर आवश्यक गोष्टी घेण्यासाठी नागरिकांनी दुकानांमध्ये गर्दी केली होती. सकाळी वाईनशाॅप सुरु असल्याचे पाहून मद्यपींनी दुकानाबाहेर रांगा लावल्या होत्या.
गर्दी वाढत असल्याचे पाहून दारुची दुकाने बंद करण्यात आली. तसेच इतर अत्यावश्यक सेवेतील दुकाने सोडून इतर दुकाने बंद ठेवण्यात आली होती. परंतु काय सुरु आणी काय बंद या संभ्रमात दुकानदार असल्याने काहींनी दुकाने अर्धी उघडी ठेवली होती. पोलिसांच्या राऊंडनंतर दुकानदारांनी दुकाने बंद केली.
निर्बंध कडक करावेत परंतु लाॅकडाऊन नको, असे नागरिकांचे म्हणणे असले तरी नियम न पाळणाऱ्या नागरिकांमुळे संसर्गाचा धोका वाढत आहे. त्यामुळे पुण्यावर लाॅकडाऊनची वेळ आली आहे, असेही काहींचे म्हणणे होते.
----------------------
फोटो WA0013 : केदारीनगर येथील वाईनशाॅपबाहेर मद्यपींनी गर्दी केली होती.
फोटो : किराणा भरण्यासाठी नागरिकांच्या दुकानाबाहेर रांगा लागल्या होत्या.