खडकवासल्यात मुंगसाचे दर्शन...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2021 04:12 AM2021-01-19T04:12:03+5:302021-01-19T04:12:03+5:30
मुंगूस स्वत: तयार केलेल्या बिळात राहते. ते दिवसा वावरते. चाहूल लागताच ते लगेच मागील दोन पायांवर उभे राहून आजूबाजूचा ...
मुंगूस स्वत: तयार केलेल्या बिळात राहते. ते दिवसा वावरते. चाहूल लागताच ते लगेच मागील दोन पायांवर उभे राहून आजूबाजूचा अंदाज घेताना दिसते. उंदीर, पक्षी व त्यांची अंडी, साप, विंचू, बेडूक व कीटक हे मुंगसाचे भक्ष्य आहे. ते कधीकधी कंदमुळे व फळेही खाते.
मुंगसाच्या विणीचा ठराविक असा काही कालावधी नाही. मादी एकदा दोन किंवा तीन पिल्लांना जन्म देते. सात महिन्यांत पिल्लांची पूर्ण वाढ होते व पिले स्वतंत्रपणे जगू शकतात.
सापाचे विष मुंगसाला घातक नाही, असे आपल्याला वाटत असेल तरी ते चुकीचे आहे. सापाचे विष कमी प्रमाणात असेल, तर त्याचा मुंगसावर काही परिणाम होत नाही.
---------------------
खडकवासला परिसरात पपई खाताना मुंगूस. (छायाचित्र - वैजयंती गाडगीळ)