२४ हजार जणांचे ‘आरटीई’साठी अर्ज, पहिला दिवस ठरला गोंधळाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2018 03:37 AM2018-02-13T03:37:02+5:302018-02-13T03:37:11+5:30
शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पुणे जिल्हयाच्या शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिस-या दिवस अखेर २४ हजार ६५४ जणांनी नोंदणी केली आहे तर ८ हजार २८ जणांचे आॅनलाइन अर्ज जमा झाले आहेत.
पुणे : शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) पुणे जिल्हयाच्या शाळांमधील २५ टक्के मोफत प्रवेशासाठी तिस-या दिवस अखेर २४ हजार ६५४ जणांनी नोंदणी केली आहे तर ८ हजार २८ जणांचे आॅनलाइन अर्ज जमा झाले आहेत.
पुणे जिल्हयात आरटीई अंतर्गत ९३४ शाळांमध्ये १६ हजार ४४४ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. आरटीई प्रवेशासाठी अर्ज भरण्याची प्रक्रिया शनिवारपासून सुरू झाली. अर्ज भरण्यासाठी पहिले दोन दिवस पालकांना अडचणींचा सामना करावा लागला. संकेतस्थळ लवकर न उघडणे, अनुसुचित जातीचा कॉलमच उपलब्ध नसणे, उत्पन्न नमूद करण्यात अडचणी येणे, सर्व्हर डाऊन असणे आदी अडचणी अर्ज भरताना येत होत्या. त्यातून मार्ग काढत ८ हजार २८ जणांचे अर्ज जमा झाले आहेत.
- शनिवारचा पहिला दिवस अत्यंत गोंधळाचा ठरला. संकेतस्थळ लवकर न उघडणे, अजी अनुसूचित जातीचा कॉलमच उपलब्ध नसणे, उत्पन्न नमूद करण्यात अडचणी येणे आदी अडचणींचा पालकांना सामना करावा लागला. रविवारी शासकीय कार्यालये बंद होती, त्यामुळे या अडचणी सोडविण्यासाठी कोणत्याही हालचाली झाल्या नाहीत.