पंधरा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल : ९ एप्रिलला निवडणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:39+5:302021-04-02T04:11:39+5:30

पुणे : महापालिकेच्या पंधरा प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. या पदासाठीची निवडणूक येत्या ...

Application for the post of Chairman of 15 Ward Committees: Election on 9th April | पंधरा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल : ९ एप्रिलला निवडणूक

पंधरा प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठी अर्ज दाखल : ९ एप्रिलला निवडणूक

Next

पुणे : महापालिकेच्या पंधरा प्रभाग समिती अध्यक्ष पदासाठी गुरुवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे. या पदासाठीची निवडणूक येत्या शुक्रवार (दि. ९) रोजी होणार आहे़

पुणे महापालिकेत भाजपचे स्पष्ट बहुमत असल्याने, विषय समित्यांसह प्रभाग समित्यांवरही भाजपची वर्णी लागणार हे स्पष्ट आहे़ भाजपने यावर्षी नवीन सभासदांना तर काही भागात ज्येष्ठ सभासदांना संधी देत सर्व भागांना प्रतिनिधित्व देण्याचा प्रयत्न असल्याचे सांगितले आहे़ दरम्यान भाजपच्या उमेदवारांसह महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी गुरूवारी नगरसचिव शिवाजी दौंडकर यांच्याकडे आपले उमेदवारी अर्ज दाखल केले़

प्रभाग समितीनिहाय दाखल झालेले अर्ज पुढीलप्रमाणे :-

१़ औंध बाणेर क्षेत्रीय कार्यालय : बंडू उर्फ प्रकाश ढोरे (भाजप)

२़ शिवाजीनगर घोलेरोड क्षेत्रीय कार्यालय : नीलिमा खाडे (भाजप)

३़ सिंहगड रोड क्षेत्रिय कार्यालय : ज्योती गोसावी (भाजप)

४़ बिबवेवाडी क्षेत्रीय कार्यालय : वर्षा साठे (भाजप)

५़ कोंढवा - येवलेवाडी क्षेत्रिय कार्यालय : वृषाली कामठे (भाजप)

६़ कसबा विश्रामबागवाडा क्षेत्रिय कार्यालय : स्मिता वस्ते (भाजप), पल्लवी जावळे (महाविकास आघाडी)

७़ ढोले पाटील रोड क्षेत्रीय कार्यालय : मंगला मंत्री (भाजप)

८़ येरवडा - कळस - धानोरी क्षेत्रीय कार्यालय : अनिल टिंगरे (भाजप)

९़ कोथरूड बावधन क्षेत्रीय कार्यालय : श्रध्दा प्रभुणे (भाजप), वैशाली मराठे (महाविकास आघाडी)

१०़ नगररोड - वडगांवशेरी क्षेत्रीय कार्यालय : शीतल शिंदे (भाजप), भय्यासाहेब जाधव (महाविकास आघाडी)

११़ धनकवडी - सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय : महेश वाबळे (भाजप), स्मिता कोंढरे (महाविकास आघाडी)

१२़ वारजे कर्वेनगर क्षेत्रीय कार्यालय : वृषाली चौधरी (भाजप), सायली वांजळे (महाविकास आघाडी)

१३़ हडपसर मुंढवा क्षेत्रीय कार्यालय : मारुती तुपे (भाजप), गणेश ढोरे (महाविकास आघाडी)

१४़ भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालय : आरती कोंढरे (भाजप), रफिक शेख (महाविकास आघाडी)

१५़ वानवडी-रामटेकडी क्षेत्रीय कार्यालय : हमीदा सुंडके (महाविकास आघाडी)

---

चौकट :-

पुणे महानगरपालिकेच्या जैवविविधता व्यवस्थापन (बीडीपी) समितीच्या अध्यक्षपदी भाजपचे नगरसेवक संजय घुले यांची निवड करण्यात आली. यापूर्वीच्या अध्यक्षांची राजीनामा दिल्याने गेल्या काही महिन्यांपासून हे पद रिक्त होते. त्या जागी घुले यांना पक्षाच्या वतीने संधी देण्यात आली आहे.

Web Title: Application for the post of Chairman of 15 Ward Committees: Election on 9th April

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.