महापालिकेच्या चार समित्यांच्या अध्यक्ष उपाध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 2, 2021 04:11 AM2021-04-02T04:11:37+5:302021-04-02T04:11:37+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : पुणे महापालिकेच्या चार समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी बुधवारी भाजपच्या उमेदवारांसह, महाआघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी ...
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : पुणे महापालिकेच्या चार समित्यांच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी बुधवारी भाजपच्या उमेदवारांसह, महाआघाडीच्या उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले़ ही निवडणुक येत्या बुधवार (दि. ७) रोजी होणार आहे़
भाजपच्यावतीने विधी समितीच्या अध्यक्षपदासाठी बापू कर्णे यांनी, तर महाविकास आघाडीतर्फे युवराज बेलदरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तर उपाध्यक्षपदासाठी भाजपच्या संदिप जºहाड यांनी तर महाविकास आघाडीच्या विशाल धनवडे यांनी अर्ज दाखल केला आहे़ याचबरोबर शहर सुधारणा समितीच्या अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी अनक्रमे भाजपच्या आनंद रिठे व उमेश गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे़ तर महाविकास आघाडीतर्फे वनराज आंदेकर व संगीता ठोसर यांनी अर्ज दाखल केला आहे़
महिला व बाल कल्याण समितीच्या अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे रूपाली धाडवे व अर्चना मुसळे यांनी अर्ज भरला असून, महाविकास आघाडीतर्फे श्वेता चव्हाण व वैशाली मराठे यांनी अर्ज भरला आहे़ तसेच क्रीडा समितीसाठी भाजपतर्फे अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे अजय खेडेकर आणि ज्योती कळमकर यांनी अर्ज दाखल केला आहे़ तर महाविकास आघाडीतर्फे अध्यक्षपदासाठी व उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे रफिक शेख व भैय्यासाहेब जाधव यांनी अर्ज दाखल केला आहे़
----
इतरांना उमेदवारी देऊन निष्ठावंतांवर अन्याय केला : प्रवीण चोरबेले
आमच्या सारख्या निष्ठावंत कार्यकर्त्यांवर शहर भाजपने अन्याय केला आहे़ इतर समितींवर संधी मिळावी याकरिता मागणी केली असताना, पक्षाने मला तीन वेळा क्रीडा समितीवर नियुक्त केले़ यावेळी अध्यक्षपदाची संधीची अपेक्षा होती, पण इतरांना या पदांवर संधी देण्यात आली आहे़ महापालिकेच्या सभागृहात एकमेव जैन समाजाचे प्रतिनिधीत्व असताना, मला डावलण्यात आले असल्याचा आरोप नगरसेवक प्रविण चोरबेले यांनी केला आहे़ या नाराजीमुळे लागलीच चोरबेले यांनी क्रीडा समिती सदस्यपदाचा राजीनामाही दिला आहे़