पुरवणी परीक्षेचे अर्ज सोमवारपासून

By admin | Published: May 28, 2016 04:28 AM2016-05-28T04:28:35+5:302016-05-28T04:28:35+5:30

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३० मेपासून आॅनलाईन अर्ज भरता

The application for the supplementary examination from Monday | पुरवणी परीक्षेचे अर्ज सोमवारपासून

पुरवणी परीक्षेचे अर्ज सोमवारपासून

Next

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत जुलै महिन्यात घेण्यात येणाऱ्या इयत्ता बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना ३० मेपासून आॅनलाईन अर्ज भरता येणार आहे. नियमित शुल्कासह अर्ज भरण्याची मुदत ९ जूनपर्यंत असेल.
मंडळामार्फत या वर्षीपासून बारावीची पुरवणी परीक्षा सप्टेंबर-आॅक्टोबरऐवजी जुलै महिन्यात घेण्यात येणार आहे. नियमित, पुनर्परीक्षार्थी, नावनोंदणी प्रमाणपत्रप्राप्त खासगी विद्यार्थी तसेच श्रेणीसुधार योजनेअंतर्गत व तुरळक विषय घेऊन प्रविष्ट होणाऱ्या विद्यार्थ्यांना या परीक्षेसाठी अर्ज करता येतील. विद्यार्थ्यांनी उच्च माध्यमिक शाळा किंवा कनिष्ठ महाविद्यालयामार्फत मंडळाच्या संकेतस्थळावर आॅनलाईन अर्ज करावेत, असे आवाहन मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना नियमित शुल्कासह दि. ३० मे ते ९ जून या कालावधीत आॅनलाईन अर्ज भरता येतील. तर, विलंब शुल्कासह अर्ज करण्यासाठी दि. १० ते १३ जून हा कालावधी देण्यात आला आहे. श्रेणीसुधार करू इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी जुलै २०१६ व फेब्रुवारी-मार्च २०१७ अशा दोन संधी उपलब्ध असतील, अशी माहिती पाटील यांनी दिली.
संकेतस्थळ : www. mahahsscboard.maharashtra.gov.in

Web Title: The application for the supplementary examination from Monday

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.