सनदी लेखापालाची ‘एसपीव्ही’साठी नियुक्ती
By admin | Published: May 27, 2017 01:17 AM2017-05-27T01:17:12+5:302017-05-27T01:17:12+5:30
पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अभियान राबविण्यासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे
लोकमत न्यूज नेटवर्क
पिंपरी : पिंपरी-चिंचवड शहरात स्मार्ट सिटी अभियान राबविण्यासाठी एसपीव्ही कंपनी स्थापन करण्यात येणार आहे. कंपनीची रचना निश्चित करून तत्काळ कंपनी स्थापन करण्यासाठी सनदी लेखापालाची नियुक्ती करण्यात येणार आहे. त्यासाठी एक लाख रुपये सेवा करासह टेंडर टर्म्स, फायलिंग
फीज, स्टॅम्प ड्युटी, डिजिटल सिग्नेचर अॅण्ड गर्व्हमेंट फीज यासाठी प्रत्यक्ष येणारा खर्च महापालिकेला करावा लागणार आहे.
स्मार्ट सिटी अभियानाअंतर्गत पिंपरी - चिंचवड महापालिकेचाही समावेश झाला आहे. शहरात स्मार्ट सिटी अभियान राबविण्याकरिता विशेष उद्देश वहन (एसपीव्ही) कंपनी स्थापन करण्यात यावी, असे राज्याच्या नगरविकास विभागाने कळविले होते. तसेच एसपीव्हीची रचना निश्चित करून कंपनीची तत्काळ स्थापना करण्याचे आदेश दिले. पिंपरी- चिंचवड शहराचा तिसऱ्या टप्प्यात समावेश झालेला असल्याने नियोजनासाठी अल्प कालावधी आहे. त्यासाठी लेखापाल (सी. ए.) नेमणूक करण्यासाठी निविदा मागविण्यात आल्या. ए. एन. गावडे अॅण्ड को- चार्टर्ड अकाऊंटंस यांनी लघुत्तम दराची निविदा सादर केली. त्यामध्ये एक लाख रुपये सेवा करासह टेंडर
टर्म्स, फायलिंग फीज, स्टॅम्प ड्युटी, डिजिटल सिग्नेचर अॅण्ड गर्व्हमेंट फीज यासाठी प्रत्यक्ष येणारा खर्च महापालिकेला करावा लागेल, असे नमूद केले आहे. सनदी लेखापालाच्या नियुक्तीनंतर स्मार्ट सिटीअंतर्गत एसपीव्ही स्थापनेच्या प्रक्रियेला गती मिळणार आहे.
गावडे अॅण्ड को-चार्टर्ड अकाऊंटंस यांचे दर अर्थसंकल्पीय दरापेक्षा ३३.३३ टक्के कमी आहेत. त्यांनी सादर केलेल्या कागदपत्रांनुसार, एसपीव्ही कंपनी स्थापन करण्याबाबत पुणे, ठाणे आणि सोलापूर महापालिकेत कामकाज केल्याचा अनुभव व कामकाज आदेशाचा समावेश आहे. त्यानुसार, ए. एन. गावडे अॅण्ड को-चार्टर्ड अकाऊंटस यांची एसपीव्ही कंपनी स्थापन करण्यासाठी सनदी लेखापाल म्हणून संधी मिळणार आहे.