दहावी, बारावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी समुपदेशकांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 05:52 PM2018-02-15T17:52:38+5:302018-02-15T17:53:10+5:30
इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या काळात मानसिक दडपणाखाली जाणे, नकारात्मक विचार मनात डोकावणे अशा प्रकारांमुळे अनेकदा विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष लागत नाही. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम परीक्षेवर होतो. या गर्तेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.
पुणे - इयत्ता दहावी व बारावी परीक्षेच्या काळात मानसिक दडपणाखाली जाणे, नकारात्मक विचार मनात डोकावणे अशा प्रकारांमुळे अनेकदा विद्यार्थ्यांचे अभ्यासावर लक्ष लागत नाही. त्यामुळे त्याचा विपरीत परिणाम परीक्षेवर होतो. या गर्तेत अडकलेल्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहा समुपदेशकांची नियुक्ती केली आहे.
राज्य शिक्षण मंडळाकडून दरवर्षी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी समुपदेशक नियुक्त केले जातात. यावर्षी दहावीची परीक्षा दि. १ ते २४ मार्चदरम्यान तर बारावीची दि. २१ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत घेतली जाणार आहे. या कालावधीत अनेक विद्यार्थी नकारात्मक विचाराने किंवा परीक्षेच्या भितीने मानसिक दडपणाखाली असतात. अशा विद्यार्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठी राज्य मंडळाकडून आॅनलाईन समुपदेशन करण्यात येणार आहेत. त्यासाठी राज्य स्तरावर दहा समुपदेशकांची नियुक्ती करण्यात आली आहे. परीक्षेच्या काळात सकाळी ८ ते रात्री ८ यावेळेत विद्यार्थी किंवा पालकांना मोबाईलद्वारे त्यांच्याशी संवाद साधता येईल, अशी माहिती राज्य मंडळाचे सचिव कृष्णकुमार पाटील यांनी दिली. मात्र, विद्यार्थी, पालक यांनी परीक्षा केंद्र, बैठक व्यवस्था व प्रश्नपत्रिकेसंबंधित प्रश्न समुपदेशकांना विचारता येणार नाहीत, असे पाटील यांनी स्पष्ट केले.
समुपदेशकांचे मोबाईल क्रमांक -
१. ७७९६८६३२३८
२. ७७६७९६०८०४
३. ७०६५४७५३६०
४. ९०२८२७४६५३
५. ८४५९११२१३३
६. ९१५२३७१३६१
७. ८६५२१०२१४०
८. ९०६७९८६८७२
९. ७७९६८७४४७४
१०. ७०८३४००७१८