‘स्मार्ट सिटी’साठी सल्लागार नियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 01:28 AM2017-08-17T01:28:40+5:302017-08-17T01:28:42+5:30
अध्यक्षांना वेळ नसल्याने रद्द करण्यात आलेली पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची सभा शुक्रवारी होणार आहे
पिंपरी : अध्यक्षांना वेळ नसल्याने रद्द करण्यात आलेली पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेडची सभा शुक्रवारी होणार आहे. त्यात नवीन सदस्यांना सामावून घेणे, कंपनी सचिव नियुक्त करणे, कंपनी सील, पॅनसिटी व एरिया बेस प्रकल्पांसाठी सल्लागार नियुक्तीचा विषयावर निर्णय होईल.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाने पिंपरी-चिंचवडचा समावेश करू, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आश्वासन दिले होते. महापालिका निवडणुकीनंतर या संदर्भात प्रस्ताव पाठविला. त्यास मंंजुरी मिळाली. त्यानंतर ‘एसपीव्ही’ची स्थापना करण्यात आली. तसेच प्रशासनाने पॅनसिटी, एरिया बेस डेव्हलपमेंटचे नियोजन केले. कंपनी स्थापनेनंतर पहिली बैठक शनिवारी पालिकेतील मुख्य भवनात होणार होती. मात्र, अध्यक्ष व नगरविकास विभागाचे प्रधान सचिव डॉ. नितीन करीर यांना मुख्यमंत्र्यांच्या दौºयामुळे वेळ नव्हता त्यामुळे बैठक रद्द केली होती.
येत्या शुक्रवारी होणाºया बैठकीस सदस्य महापौर नितीन काळजे, आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, स्थायी समिती सभापती सीमा सावळे, विरोधी पक्षनेते योगेश बहल, विभागीय आयुक्त चंद्रकांत दळवी, पालिका आयुक्त श्रावण हर्डीकर आदी उपस्थित राहणार आहेत.
>स्मार्ट सिटी कंपनीची पहिली बैठक अध्यक्षांना ऐनवेळी महत्त्वाचे काम असल्याने रद्द करण्यात आली होती. महापालिकेत शुक़्रवारी सायंकाळी साडेपाचला बैठक होणार असून, त्यावेळी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात येणार आहेत.
- श्रावण हर्डीकर, आयुक्त