राष्ट्रवादीकडून समाविष्ट गावांकरिता समन्वयकांची नेमणूक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 04:08 AM2021-07-05T04:08:49+5:302021-07-05T04:08:49+5:30
पुणे : राज्य शासनाच्या आदेशाने पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आगामी ...
पुणे : राज्य शासनाच्या आदेशाने पालिकेच्या हद्दीत समाविष्ट झालेल्या २३ गावांवर राष्ट्रवादी काँग्रेसकडून लक्ष देण्यास सुरुवात केली आहे. आगामी पालिका निवडणुकीच्या अनुषंगाने गावांमधील समस्यांसंदर्भात समन्वय साधण्याकरिता २३ पदाधिकाऱ्यांची नेमणूक केली आहे.
२३ गावांचा महापालिकेत समावेश झाल्याने प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होणार आहे. दैनंदिन कामांसाठी लोकप्रतिनिधींच्या संपर्काची आवश्यकता आहे. येथील प्रशासकीय यंत्रणा सुरळीत होईपर्यंत नागरिकांच्या अडी-अडचणी, समस्या हे पदाधिकारी जाणून घेणार आहेत. तसेच, प्रशासकीय समन्वय साधून नागरिकांच्या अडचणी सोडविण्यात येणार आहेत.
----
समाविष्ट गावांच्या समावेशाची प्रक्रिया सुरू झाली आहे. या निर्णयामुळे या गावांतील जिल्हा परिषद, पंचायत समित्यांमधील पदे संपुष्टात आली आहेत. पालिका निवडणुकीसाठी अद्याप कालावधी शिल्लक आहे. त्यातच विद्यमान लोकप्रतिनिधींची पदे संपुष्टात आल्याने या गावांमधील प्रशासकीय पातळीवर अडचण निर्माण होणार आहे. या गावांसाठी समन्वयाची जबाबदारी देण्यात आलेले पदाधिकारी गावाला भेट देऊन, नागरिकांच्या अडचणी जाणून घेतील. तसेच त्या सोडविण्यासाठी प्रयत्न करतील.
- प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी
------
१. मांजरी (बु.) – आमदार चेतन तुपे
२. वाघोली – आमदार सुनील टिंगरे
३. नांदेड – विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ
४. खडकवासला – नगरसेवक सचिन दोडके
५. म्हाळुंगे – नगरसेवक बाबुराव चांदेरे
६. सूस – नगरसेवक बाबुराव चांदेरे
७. बावधन (बुद्रुक) – नगरसेवक दीपक मानकर
८. किरकटवाडी – नगरसेविका सायली वांजळे
९. पिसोळी- नगरसेविका नंदा लोणकर
१०. कोपरे – नगरसेवक सचिन दोडके
११. कोंढवे धावडे – नगरसेवक दिलीप बराटे
१२. नऱ्हे – नगरसेवक दत्तात्रय धनकवडे
१३. होळकरवाडी – नगरसेवक गणेश ढोरे
१४. औताडे-हांडेवाडी – नगरसेवक गणेश ढोरे
१५. वडाचीवाडी – नगरसेवक योगेश ससाणे
१६. शेवाळेवाडी – नगरसेविका वैशाली बनकर
१७. नांदोशी – नगरसेवक दिलीप बराटे
१८. सणसनगर – नगरसेवक सचिन दोडके
१९. मांगडेवाडी - नगरसेवक प्रकाश कदम
२०. भिलारेवाडी – नगरसेविका अमृता बाबर
२१. गुजर निंबाळकरवाडी – नगरसेवक विशाल तांबे
२२. जांभूळवाडी - नगरसेविका स्मिता कोंढरे
२३. कोळेवाडी – नगरसेवक युवराज बेलदरे