लक्ष्मीबाई दगडूशेठ दत्त मंदिर ट्रस्टवर नऊ विश्वस्तांची नियुक्ती; मावळत्या मंडळातील दोघांची फेरनियुक्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2021 04:10 AM2021-02-08T04:10:50+5:302021-02-08T04:10:50+5:30
पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या नऊ विश्वस्तांची नियुक्ती सहाय्यक धर्मादाय आयुक्त अमरदीप तिडके यांनी जाहीर ...
पुणे : श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई दत्त मंदिर ट्रस्टच्या नऊ विश्वस्तांची नियुक्ती सहाय्यक धर्मादाय आयुक्त अमरदीप तिडके यांनी जाहीर केली. ही नियुक्ती पुढील पाच वर्षांसाठी म्हणजे २०२६ पर्यंत असणार आहे.
नव्याने नेमलेल्या विश्वस्त मंडळात समाजातील विविध क्षेत्रातील व्यक्तींचा समावेश आहे. त्यामध्ये बॅंकिंग क्षेत्रातील विश्वेश्वर बॅंकेचे चेअरमन सुनील रुकारी, महेंद्र पिसाळ, डॅा. पराग काळकर, सामाजिक कार्यकर्ते राजू बलकवडे, ॲड. प्रताप परदेशी व ॲड. रजनी उकरंडे व अक्षय हलवाई यांची विश्वस्त म्हणून नेमणूक झाली आहे. यात मावळत्या विश्वस्त मंडळातील अध्यक्ष ॲड. शिवराज प्रतापसिंह कदम जहागिरदार व कार्यकारी विश्वस्त युवराज लक्ष्मण गाडवे यांची विश्वस्तपदी फेरनियुक्ती झाली आहे.
इंदौर येथील सद्गुरू माधवनाथ महाराज यांचे प्रेरणेने श्रीमती लक्ष्मीबाई दगडूशेठ हलवाई यांनी या मंदिराची १८९८ मध्ये स्थापना करून त्याची व्यवस्था पाहण्यासाठी पंचकमिटी नेमली होती. ट्रस्ट कायदा आल्यावर सुरूवातीलाच पुण्यातील प्रमुख मंदिरांपैकी दत्तमंदिराचा ट्रस्ट नोंदविण्यात आला. दर पंचवार्षिक कालावधीसाठी पुण्याचे सहाय्यक धर्मादाय आयुक्त वर्तमानपत्रात जाहिरात देऊन मुलाखतीद्वारे नऊ जणांचे विश्वस्त मंडळ नेमतात. त्यानुसार ही नेमणूक करण्यात आली आहे.
......