Gram Panchayat: भोर तालुक्यातील २० ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक
By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2023 04:19 PM2023-07-06T16:19:42+5:302023-07-06T16:20:03+5:30
जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणुका न झाल्याने २० ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे...
भोर (पुणे) : भोर तालुक्यातील १५६ पैकी २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या असून मुदत संपलेल्या २० ग्रामपंचायतींवर प्रशासनाच्या वतीने प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. यामुळे सरपंचांचे अधिकार संपुष्टात आले आहेत.
जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या २७ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून निवडणुका न झाल्याने २० ग्रामपंचायतींवर प्रशासकांची नेमणूक करण्यात आली आहे. तसा आदेश प्रशासनाच्या वतीने काढण्यात आला आहे. ग्रामपंचायतींचा कारभार सहा प्रशासकांकडून पाहिला जाणार असल्याचे गटविकास अधिकारी किरणकुमार धनवाडे यांनी सांगितले.
जानेवारी २०२३ ते मार्च २०२३ मध्ये मुदत संपणाऱ्या २७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका लांबल्या असल्याने ग्रामपंचायतींवर सहा अधिकाऱ्यांची नेमणूक केली. यात पंचायत समितीचे तीन विस्तार अधिकारी व कृषी विभागाचे दोन अधिकारी प्रशासक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही ग्रामपंचातींवर सहा तर काही ग्रामपंचायतींवर सहा महिन्यांपासून प्रशासकाची नेमणूक करण्यात आली आहे. याचा ग्रामपंचायतींच्या कारभारावर परिणाम होत आहे. यामुळे निवडणुका घेण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत.
प्रशासक नेमलेल्या ग्रामपंचायती :
टिटेघर, नांदगाव, वरोडी बुद्रूक, वरोडीडायमुख, पळसोशी, जयतपाड, कांबरे बुद्रूक, कुरुंजी, माळेगाव, वडतुंबी, शिरवली हि.मा,साळव, कोंढरी, रायरी, पऱ्हर बुद्रूक, पऱ्हर खुर्द, दापकेघर, आंबवडे, वरोडी खुर्द महुडे खुर्द यांचा समावेश आहे. ७ ग्रामपंचायतींची मुदत संपल्यावर त्या ग्रामपंचायतींवरही प्रशासक नेमला जाणार आहे.