गुणवत्ता सुधारण्यासाठी पालक अधिकाऱ्यांची नियुक्ती, शालेय शिक्षण विभागाचा निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 2, 2018 06:41 AM2018-08-02T06:41:34+5:302018-08-02T06:41:51+5:30
राज्यातील शैक्षणिक विभागांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी; तसेच प्रत्येक जिल्ह्याला शैक्षणिक साह्य करण्यासाठी, तेथील कामाची तपासणी करून समन्वय आणि नियंत्रण राखण्यासाठी जिल्हानिहाय पालक अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
पुणे : राज्यातील शैक्षणिक विभागांच्या गुणवत्तेमध्ये सुधारणा करण्यासाठी; तसेच प्रत्येक जिल्ह्याला शैक्षणिक साह्य करण्यासाठी, तेथील कामाची तपासणी करून समन्वय आणि नियंत्रण राखण्यासाठी जिल्हानिहाय पालक अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शैक्षणिक गुणवत्तेमध्ये राज्य देशात प्रथम येण्यासाठी त्यांना उद्दिष्ट निश्चित करून देण्यात आले आहे.
राज्यभरातील ३४ जिल्ह्यांमध्ये नियुक्त केलेल्या पालक अधिकाºयांची यादी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे सहसंचालक
गिरीश देशमुख यांनी बुधवारी
प्रसिद्ध केली आहे. पुणे जिल्ह्यातून सहायक कार्यक्रम अधिकारी माधुरी वाडेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
शिक्षण विभागात सहसंचालक, प्रकल्प समन्वयक, लेखाधिकारी, उपअभियंता, खरेदी अधिकारी आदी पदांवर कार्यरत असलेल्या अधिकाºयांना पालक अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.
महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेच्या माध्यमातून समग्र शिक्षा अभियान राबवण्यात येत आहे. त्या अंतर्गत शिक्षण हक्क कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक साह्य, विद्याार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्तावृद्धी, शिक्षक सक्षमीकरण, पायाभूत सुविधा, शाळा सुधारणा करणे आवश्यक आहे.
शैक्षणिक प्रगतीचे मूल्यमापन करण्यासाठी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात येत आहे. या कामाला गती देण्यासाठी पालक अधिकाºयांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या आहेत.
जिल्हानिहाय पालक अधिकारी
पुणे - माधुरी वाडेकर, सांगली - गिरीश देशमुख, चंद्रपूर श्रीनिवास शास्त्री, गोंदिया - प्रमोद गांवकर, नगर - आशा ठोंबरे, सातारा - राजेंद्र शहाडे, जालना - दिलीप न्हिवेकर, कोल्हापूर - स्मिता मुळेकर, सोलापूर - शैलेश सुर्वे, नंदुरबार - योगेश बोराडे, नागपूर - महेश भोकरे, मुंबई, ठाणे व उपनगर - अजय काकडे, नाशिक व मुंबई शहर - अशोककुमार यादव, जळगांव - राजेंद्र माने, परभणी - प्रमोद पाटील, बुलढाणा - किरण काळे, रत्नागिरी - अनिल ठोंगिरे, वाशिम - गजानन पाटील, सिंधुदुर्ग - परेश चव्हाण, भंडारा -
प्राजक्ता कोरे, अमरावती - सज्जला विसपुते, उस्मानाबाद - विश्वास कांबळे, अकोला - स्मिता पाठक, बीड - रणजित देशमुख, यवतमाळ - असिफ शेख, वर्धा - सलील वाघमारे,
गडचिरोली - अशोक उगलमुगले, नांदेड - कांचन जोशी, रायगड - हितेंद्र चौधरी, औरंगाबाद -
श्याम मक्रमपुरे, धुळे - जितेंद्र राठी, लातूर - नूतन मघाडे, पालघर - दत्तात्रय वाडेकर, हिंगोली - लीलाधर कारभारी.
३१ आॅगस्टपर्यंत अहवाल सादर करा
पालक अधिकाºयांनी आपापल्या विभागातील शाळांना या भेटी देऊन शाळेतील शिक्षणाचे निष्कर्ष, विद्याार्थ्यांच्या प्रगतीचा आलेख, शाळासिद्धी, शगुन, महाराष्ट्र आंतरराष्टÑीय शिक्षण मंडळ, तसेच समग्र शिक्षण अभियानांतर्गत सुरू असलेल्या विविध कार्यक्रमांचा आढावा घेऊन त्या बाबतचा अहवाल ३१ आॅगस्टपर्यंत परिषदेला सादर करावा असे स्पष्ट करण्यात आले आहे.