बहारदार तबला वादन व भक्तिरसपूर्ण गायकीला दाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2020 04:11 AM2020-12-31T04:11:42+5:302020-12-31T04:11:42+5:30
पुणे : ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे तर्फे दत्त जयंतीनिमित्त आयोजित सांगीतिक मैफिलीत युवा पिढीतील प्रसिद्ध तबला वादक अविनाश ...
पुणे : ज्ञानदा एज्युकेशन सोसायटी, पुणे यांचे तर्फे दत्त जयंतीनिमित्त आयोजित सांगीतिक मैफिलीत युवा पिढीतील प्रसिद्ध तबला वादक अविनाश पाटील यांचे बहारदार सोलो वादन आणि युवा गायक मयूर महाजन यांच्या भक्तिरसपूर्ण अभंगवाणीस रसिकांनी मनमुराद दाद दिली.
प्रारंभी अविनाश पाटील यांनी ताल तीनताल मध्ये सोलो वादन सादर केले. यामधे पेशकार, कायदे, रेले, चक्रधार, गती,तुकडे असे विविध प्रकार अतिशय तयारीने सादर करुन रसिकांची वाहवा मिळविली. त्यानंतर मयूर महाजन यांनी ‘अबीर गुलाल उधळीत रंग’, ‘सावळे सुंदर रुप मनोहर’, ‘कैवल्याच्या चांदण्याला भुकेला चकोर असे विविध अभंग सादर करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. मंगेश अबनावे यांनी दत्त नामाचा गजर सादर केला. कलाकारांना आकाश तुपे यांनी पखवाज वर साथसंगत केली. शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करीत मैफील आयोजित केली. यावेळी पंचक्रोशीतील रसिकांसह संस्थेचे अध्यक्ष प्रदीप सुतार, अमोल गवळी, सतीश पांचाळ, नितीन पिसे, प्रदीप आगवणे उपस्थित होते. किल्ले स्पर्धेत बक्षीस मिळविलेले शौर्य वायदंडे, नमिता जगताप, चैतन्य उट्टे यांचा सन्मान प्राचार्य प्रज्ञा आदलिंगे, अमोल शिंगडगाव, प्रीती शिंदे यांचे हस्ते केला. ही मैफल इंस्पायर इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात पार पडली.