१५५० बससाठी अखेर मंजुरी

By admin | Published: August 11, 2016 03:28 AM2016-08-11T03:28:34+5:302016-08-11T03:28:34+5:30

शहरातील बसची संख्या अपुरी पडत असल्याने पुणे महानगर परिवहन महमंडळासाठी (पीएमपी) १५५० बसची टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याच्या प्रस्तावास

Approval for the 1550 bus | १५५० बससाठी अखेर मंजुरी

१५५० बससाठी अखेर मंजुरी

Next

पुणे : शहरातील बसची संख्या अपुरी पडत असल्याने पुणे महानगर परिवहन महमंडळासाठी (पीएमपी) १५५० बसची टप्प्याटप्प्याने खरेदी करण्याच्या प्रस्तावास मुख्य सभेने बुधवारी अंतिम मंजुरी दिली. यातील १०० बस पालिकेच्या निधीतून खरेदी करण्यात येणार आहे, कर्ज उभारणीतून ९०० बसची खरेदी केली जाणार आहे उर्वरित ५५० बस भाडेतत्त्वावर घेण्यात येणार आहेत. टप्प्याटप्प्याने बस खरेदीसाठी रक्कम उपलब्ध करून देण्याचे अधिकार प्रस्तावामध्ये आयुक्तांना देण्यात आले होते, नगरसेवकांनी उपसूचना मांडून ते अधिकार मुख्य सभेला असावेत, अशी दुरुस्ती केली. उपसूचनेसह प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
बसच्या अपुऱ्या व्यवस्थेमुळे सार्वजनिक वाहतूकव्यवस्थेचा बोजवारा उडालेला आहे. त्यामुळे शहरातील बसची संख्या वाढविण्याची मागणी सातत्याने केली जात होती. या पार्श्वभूमीवर पीएमपीच्या संचालक मंडळाने १५५० बस खरेदीचा प्रस्ताव मंजूर करून पुणे व पिंपरी-चिंचवड महापालिकांकडे पाठविला होता. स्थायी समितीच्या मंजुरीनंतर आता त्या प्रस्तावाला मुख्य सभेनेही मंजुरी दिली.
मुख्य सभेमध्ये बसखरेदीचा प्रस्ताव मांडल्यानंतर त्याची खरेदी कशाप्रकारे केली जाणार आहे याची माहिती सभासदांनी घेतली. या बसखरेदीसाठी ६० टक्के रक्कम पुणे महापालिकेला तर ४० टक्के रक्कम पिंपरी-चिंचवड पालिकेला उपलब्ध करून द्यावी लागणार आहे. पालिकेच्या निधीतून १०० बसची खरेदी करण्यात येणार आहे, कर्ज उभारणीतून ९०० बस घेतल्या जाणार आहेत. ५५० बस भाडेतत्त्वावर घेणार आहेत. बस उपलब्ध झाल्यानंतर मूलभूत सुविधा देण्याचे दायित्वही महापालिकांवर असणार आहे.


पीएमपी म्हटले की फारसे चांगले चित्र पुणेकरांसमोर उभे राहत नव्हते, मात्र गेल्या काही दिवसांतील उपाययोजनांमुळे पीएमपीच्या रूपात आमूलाग्र बदल होतो आहे. पीएमपीच्या सर्व बसला जीपीएस सिस्टीम बसविण्यात आली आहे. त्यामुळे सध्या बस कुटे आहे, ती कधी बसस्टॉपवर येणार आहे, याची माहिती पीएमपीच्या अधिकृत अ‍ॅपच्या माध्यमातून नागरिकांना उपलब्ध होऊ लागली आहे. बस बंद पडण्याचे प्रकार कमी करण्यासाठी यंत्रणा कार्यान्वित केली आहे.

Web Title: Approval for the 1550 bus

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.