निराधार योजनेच्या ३८ प्रस्तावांना मंजुरी, दोन बालकांनाही मिळणार लाभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2021 04:08 AM2021-07-01T04:08:58+5:302021-07-01T04:08:58+5:30
सासवड ( ता. पुरंदर ) येथील तहसील कार्यालयात संजय गांधी योजना समितीच्या अध्यक्षा तथा पंचायत समितीच्या सदस्या सुनीता कोलते ...
सासवड ( ता. पुरंदर ) येथील तहसील कार्यालयात संजय गांधी योजना समितीच्या अध्यक्षा तथा पंचायत समितीच्या सदस्या सुनीता कोलते यांच्या अध्यक्षतेखाली या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी तहसीलदार रुपाली सरनोबत, गटविकास अधिकारी अमर माने, नायब तहसीलदार सूर्यकांत पठाडे, समितीचे सदस्य डॉ. राजेश दळवी, वैशाली निगडे, नीलम होले, कल्पना कावडे, उज्वला पोमण, संभाजी महामुनी, शांताराम बोऱ्हाडे, विजय साळुंखे, राजेश चव्हाण, या विभागाच्या ममता दुरटकर आदी उपस्थित होते.
जेजुरी येथील दोन अनाथ बालकांच्या प्रस्तावांना तातडीने मंजुरी.
जेजुरी येथील सूरज विलास घोणे आणि त्यांच्या पत्नी दुर्गा सूरज घोणे या तरुण दाम्पत्याचे एकाच महिन्यात कोरोनाने निधन झाले होते. त्यांच्या अनघा सूरज घोणे आणि आनंदी सूरज घोणे या दोन लहान मुली अनाथ झाल्या असून वृद्ध आजी-आजोबा त्यांचा सांभाळ करीत आहेत. त्यामुळे या दोन लहान बालकांना शासकीय मदत मिळण्यासाठी त्यांचे प्रस्ताव तातडीने दाखल करून त्यांना लगेचच मंजुरी देण्यात आली आहे. अध्यक्षा सुनीता कोलते यांनी जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी प्रस्ताव दाखल करण्याचे आवाहन केले. आभार संभाजी महामुनी यांनी मानले.
योजनेची प्रकरणे मंजूर झाल्यानंतर लाभार्थ्याने त्वरित पुणे जिल्हा बँकेत आपले खाते उघडावे आणि त्याची पासबुक झेरॉक्स संबंधित विभागाकडे जमा करावी त्यानंतर लाभार्थ्यांच्या खात्यावर लगेचच अनुदान जमा करण्यात येईल.
रुपाली सरनोबत, तहसीलदार
३० सासवड
सासवड तहसील कार्यालयात संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीच्या बैठकीत उपस्थित सदस्य.