दिव्यांगासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीस मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2021 04:08 AM2021-06-10T04:08:04+5:302021-06-10T04:08:04+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : दिव्यांग कल्याणकारी योजनेंतर्गत राखीव ठेवलेल्या ३ टक्के निधीचा वापर, दिव्यांगांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांवर ...

Approval for implementation of various schemes for the disabled | दिव्यांगासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीस मान्यता

दिव्यांगासाठी विविध योजनांच्या अंमलबजावणीस मान्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : दिव्यांग कल्याणकारी योजनेंतर्गत राखीव ठेवलेल्या ३ टक्के निधीचा वापर, दिव्यांगांसाठी जाहीर केलेल्या विविध योजनांवर खर्च करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे़ यामध्ये दिव्यांग-दिव्यांग, दिव्यांग-अपंग व्यक्ती विवाहासाठी ३० हजार रुपये अर्थसाहाय्य, दिव्यांग व्यक्तींनी स्थापन केलेल्या कलापथकास वाद्य खरेदीसाठी ५० हजार रुपये अर्थसाहाय्य आदी योजनांचा समावेश आहे़

समितीच्या बैठकीत या सर्व योजनांच्या अंमलबाजवणीसाठी व त्याच्या करिताच्या अर्थसाहाय्याच्या तरतुदीकरिता नुकतीच मान्यता देण्यात आली. या दोन योजनांबरोबरच ५ जणांच्या दिव्यांग बचत गटांनी सुरू केलेल्या व्यवसायास भांडवली खर्चासाठी २५ हजार रुपये देण्यात येणार आहेत. तसेच पुणे महापालिका हद्दीत राहणा-या दिव्यांग (अंधत्व, अल्पदृष्टी, कर्णबधीर, ठेंगूपणा, अ‍ॅसिड हल्ला झालेली व्यक्ती यांसह आदी दिव्यांग) यांना दरमहा २ हजार रुपये याप्रमाणे प्रतिवर्षी २४ हजार रुपये अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे़

शहरात वास्तव्यास असलेल्या किमान १५ मतिमंद व्यक्तींचा सांभाळ करणा-या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेस, प्रतिमतिमंद व्यक्तिकरिता दरमहा २ हजार रुपये याप्रमाणे मदत देण्यात येणार आहे़ याचबरोबर महापालिका हद्दीत वास्तव्य असलेल्या मतिमंद व्यक्तीच्या पालकास आपल्या पाल्याचे पालनपोषण करण्याकरिता दरमहा २ हजार रुपये असे वार्षिक २४ हजार रुपयेही देण्यास मान्यता देण्यात आली असल्याची माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने यांनी दिली़

---------------------------

दृष्टिहीनांसोबतच्या मदतनीसाला बस प्रवासात ५० टक्के सवलत

पीएमपीएमएल बसमधून पुणे शहर हद्दीत व बससेवा आहे तेथपर्यंत दृष्टिहीनांसोबत प्रवास करणा-या मदतनीसाला पीएमपीएमएलच्या तिकिटात ५० टक्के सवलत देण्याचा निर्णयही यावेळी घेण्यात आला़ याबाबतची सविस्तर माहिती महापालिकेच्या समाजकल्याण विभागाकडे उपलब्ध आहे़ मात्र, हे सर्व निर्णय मुख्य सभेच्या अंतिम मान्यतेनंतर अंमलात येणार आहेत़

---------------------------------

Web Title: Approval for implementation of various schemes for the disabled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.