घोडेगाव येथे न्यायाधीश निवासस्थानासाठी मान्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 16, 2021 04:08 AM2021-07-16T04:08:32+5:302021-07-16T04:08:32+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क घोडेगाव : घोडेगाव येथे दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) यांच्या करीता दोन निवासस्थाने बांधण्यासाठी १.४८ कोटी ...

Approval for Judge's Residence at Ghodegaon | घोडेगाव येथे न्यायाधीश निवासस्थानासाठी मान्यता

घोडेगाव येथे न्यायाधीश निवासस्थानासाठी मान्यता

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

घोडेगाव : घोडेगाव येथे दिवाणी न्यायाधीश (क.स्तर) यांच्या करीता दोन निवासस्थाने बांधण्यासाठी १.४८ कोटी रुपयांना प्रशासकीय मान्यता मिळाला आहे. यासाठी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी पाठपुरावा केला. या रकमेपैकी ७२.२५ लक्ष रुपये बांधकामाला खर्च येणार आहे. तर उर्वरीत रकमेतून गॅस पाईपलाईन, बायो डायजेस्टर, रेन वॉटर हार्वेस्टिंग, सोलर एनर्जी, पाणी पुरवठा मलनिस्सारण, विद्युतीकरण, संरक्षक भिंत, मैदान, वाहनतळ अशी कामे केली जाणार आहेत.

घोडेगाव न्यायालयात तीन कनिष्ठ स्तर न्यायाधीश आहेत. यापैकी एका न्यायाधिशांसाठी निवासस्थान बांधण्यात आलेले आहे. तर दोन न्यायाधिशांसाठी निवासस्थान नव्हते. यामुळे नव्या निवास्थानाची मागणी होती. यासाठी दिलीप वळसे पाटील यांनी प्रयत्न करून १.४८ कोटी रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याबद्दल घोडेगाव बार असोसिएशनच्यावतीने त्यांचे आभार व्यक्त करत असल्याचे अध्यक्ष अ‍ॅड. मुकूंद काळे यांनी सांगितले.

Web Title: Approval for Judge's Residence at Ghodegaon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.