म्हसे-अण्णापूर, टाकळीहाजी-निमगाव दुडे पुलाला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 04:17 AM2021-03-13T04:17:24+5:302021-03-13T04:17:24+5:30
गावडे म्हणाले की, नाबार्डमधून टाकळी हाजी निमगाव दुडे येथे घोड नदीवरील पुलासाठी ५ कोटी, तर टाकळी हाजी - वडनेर ...
गावडे म्हणाले की, नाबार्डमधून टाकळी हाजी निमगाव दुडे येथे घोड नदीवरील पुलासाठी ५ कोटी, तर टाकळी हाजी - वडनेर रस्ता सुंदीकरणासाठी ४ कोटी रुपये मंजूर झाले. काम निविदा स्तरावर आहे. या अर्थसंकल्पात म्हसे - अण्णापूर पुलासाठी ५ कोटी रुपये मंजूर झाले आहे. या पुलामुळे बेट भागातील गावांना शिरूरचे अंतर पाच किमीने कमी होणार आहे. नागरिकांचा इंधनाचा खर्च तसेच वेळ वाचणार आहे. आमदाबाद ते मलठण या शिरूरला जाणाऱ्या रस्त्यासाठी पाच कोटी, कारेगाव ते बाभुळसर रस्ता १.५ कोटी, तसेच टाकळी हाजी येथील बापुसाहेब गावडे विद्यालय ते कॉलनी (कुंड) रोड फाटा या रस्त्यांचे दुभाजकासह चौपदरी करणे या कामासाठी ३.५ कोटी रुपये मंजूर झाले आहेत.
उत्पादन शुल्क मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या माध्यमातून या भागाला अर्थसंकल्पामधे मोठा निधी मिळाला आहे. जिल्हा परीषद व शासनाच्या विविध योजने मधून रस्ते, स्मशानभूमी, शाळा, ग्रामपंचायत इमारत,अंगणवाडी यासाठी टाकळी हाजी कवठे येमाई जिल्हा परीषद गटात दोन कोटी रुपयांच्या कामांना मंजुरी मिळाली असल्यांची माहिती माजी आमदार पोपटराव गावडे यांनी दिली.