रामटेकडी येथे कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्पाला मंजुरी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 18, 2019 01:46 PM2019-06-18T13:46:17+5:302019-06-18T13:50:32+5:30

फुरसुंगी व देवाची उरुळी येथील नागरिकांनी पुणे शहरातील कचरा आपल्या हद्दीत टाकण्यास विरोध करत, येथील कचरा डेपो बंद करण्याची मागणी केली आहे...

Approval of the power generating project by garbage at Ramtekadi | रामटेकडी येथे कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्पाला मंजुरी

रामटेकडी येथे कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्पाला मंजुरी

Next
ठळक मुद्देशहरातील तब्बल ३५० मे.टन कच-यावर होणार प्रक्रियाडिसेंबर २०१९ अखेर पर्यंत देवाची उरुळी येथील कचरा डोपोवर ओपन डपिंग शंभर टक्के बंद करण्याचे आदेशशहरामध्ये सध्या दररोज सुमारे २१०० मे.टन कचरा निर्माणशहराची पुढील दहा वर्षांतील वाढ लक्षात सुमारे १५५० मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन

पुणे: हडपसर येथील रामटेकडी येथे सुमारे सहा एकर जागेत बांधा वापरा हस्तांतरित करा (बीओटी) तत्त्वावर कच-यापासून वीज निर्मिती प्रकल्पाला सोमावरी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली. या प्रकल्पामध्ये शहरातील तब्बल ३५० मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्यात येणार असून, येत्या दीड वर्षांत प्रकल्प सुरु होईल, अशी माहिती स्थायी समिती अध्यक्ष सुनिल कांबळे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
     फुरसुंगी व देवाची उरुळी येथील नागरिकांनी पुणे शहरातील कचरा आपल्या हद्दीत टाकण्यास विरोध करत, येथील कचरा डेपो बंद करण्याची मागणी केली आहे. याबाबत ग्रामस्थांनी हरित लवादामध्ये दावा देखील दाखल केले. या प्रकरणामध्ये लवादाने महापालिकेले डिसेंबर २०१९ अखेर पर्यंत देवाची उरुळी येथील कचरा डोपोवर ओपन डपिंग शंभर टक्के बंद करण्याचे आदेश दिले. या संदर्भांत महापालिकेने देखील प्रतिज्ञा पत्रकाद्वारे ओपन डपिंग बंद करण्याचे लवादाला लेखी दिले आहे. त्यानुसार महापालिकेच्या वतीने कचरा प्रक्रिया प्रकल्पासाठी खास कृती आराखडा तयार करण्यात आला असून, त्यानुसार नव्याने प्रकल्प हाती घेण्यात येत आहेत. याचाच एक भाग म्हणून सोमवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत रामटेकडी येथील ३५० मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्याच्या प्रकल्पाला मान्यता देण्यात आली.
    शहरामध्ये सध्या दररोज सुमारे २१०० मे.टन कचरा निर्माण होत असून, यापैकी केवळ १४७३ मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्यात येते. याशिवाय प्रक्रिया करण्यात येणा-या कच-यापैकी दररोज किमान दहा टक्के रिजेक्ट झालेला कचरा ओपन डपिंग केला जातो. यामुळे सध्या दररोज किमान ७०० ते ७५० मे.टन कच-यावर कोणतीही प्रक्रिया न करता ओपन डपिंग केले जाते. त्यामुळे येत्या डिसेंबर अखेर पर्यंत किमान ८०० मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कचरा प्रक्रिया प्रकल्पांचा कृती आराखडा तयार करताना शहराची पुढील दहा वर्षांतील वाढ लक्षात सुमारे १५५० मे.टन कच-यावर प्रक्रिया करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. यासाठी शहराच्या विविध भागात कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात येणार असून, त्यानुसार प्रकल्प आराखडे तयार करण्यात आले आहेत.
----------------
 पुढील दीड-दोन वर्षांत शहरामध्ये प्रस्तावित कचरा प्रक्रिया प्रकल्प
प्रकल्प            क्षमता (मे.टन)
बायोएनर्जी, रामटेकडी        ७५०
आदर्श कनस्ट्रकशन, रामटेकडी    २५
संस्कृती मॅनेजमेंट, वडगावशेरी    २५
सुखसागर नगर, कात्रज        ५०
रामनगरी, आंबेगाव        १००
हरणावळ, लोहगाव        १००
दिशा, रामटेकडी        २००
उरुळी, फुरसुंगी कचरा डेपा    २००
एकून                १५५०         

Web Title: Approval of the power generating project by garbage at Ramtekadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.