ST Strike: पुणे शहरात प्रवासी वाहतूक करण्यास खासगी वाहनांना मान्यता

By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2021 11:55 AM2021-11-10T11:55:57+5:302021-11-10T12:00:43+5:30

शासनाच्या अधिसूचनेच्या अधीन राहून पुणे शहरातील एस.टी बस स्थानकांमधून खाजगी बसेसद्वारे सकाळी ६ वाजल्यापासून नियोजनाला सुरुवात

Approval of private vehicles for passenger transport in Pune city | ST Strike: पुणे शहरात प्रवासी वाहतूक करण्यास खासगी वाहनांना मान्यता

ST Strike: पुणे शहरात प्रवासी वाहतूक करण्यास खासगी वाहनांना मान्यता

Next

पुणे : महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यात एसटी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. न्यायालय आणि प्रशासन संप मागे घेण्यास सांगूनही कर्मचारी संपावर ठाम आहेत. त्यामुळे शहरात सर्वसामान्य प्रवाशांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी सर्व खाजगी प्रवासी बसेस, शाळेच्या बसेस, कंपनीच्या मालकीच्या बसेस व मालवाहू वाहने यांना प्रवासी वाहतूक करण्यास संपमागे घेईपर्यंत मान्यता देण्यात आली आहे. 

शासनाच्या अधिसूचनेच्या अधीन राहून पुणे शहरातील एस.टी बस स्थानकांमधून खाजगी बसेसद्वारे सकाळी ६ वाजल्यापासून प्रवासी वाहतूकीचे नियोजन  करण्यात आले आहे. खाजगी बस वाहतूकदारांनी एस.टी. प्रशासनाकडून सध्याच्या एस.टीच्या प्रचलीत भाडेदरांप्रमाणे प्रवाशांकडून भाडे आकारण्याच्या सूचनाही प्रशासनाकडून देण्यात आली आहेत. 

पुणे महानगर परिवहन महामंडळच्या बसेस जिल्ह्यातील महानगरपालिका हद्दीशेजारील ग्रामीण भागांमध्येदेखील सोडण्याच्या पीएमपीएमएलच्या अधिकाऱ्यांना सूचना आहेत. प्रवाशांनी आवश्यकतेनुसार या सुविधेचा लाभ घेण्याचे प्रादेशिक परिवहन अधिकारी संजय ससाणे यांनी असे आवाहन केले आहे. 

प्रवाशांना बसत होता फटका 

एसटी कर्मचाऱ्यांनी संपास सुरुवात केल्याने एसटी वाहतूक पूर्णपणे बंद झाली होती. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. दिवाळीत झालेली भाडेवाढ सहन करीत एसटीचा प्रवासी पुन्हा एसटीने प्रवास करण्यास इच्छुक आहे. मात्र संपामुळे त्याची मोठी गैरसोय होत आहे. त्याला दुप्पट व तिप्पट दर देऊन ट्रॅव्हल्सने प्रवास कराव लागत असल्याने मोठा फटका बसत होता.  

एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका

एसटीचे राज्य सरकारात विलीनीकरणाची मागणी पूर्ण होण्यासाठी कर्मचाऱ्यांनी संप पुकारला आहे. दिवाळी संपल्यावर परतीचा प्रवास करणाऱ्यांची संख्या जास्त असताना संपाचे हत्यार उपसले आहे. राज्यांत जवळपास १२० पेक्षा जास्त डेपोत सध्या संप सुरू आहे. त्यामुळे एसटीला रोज जवळपास कोटींच्या घरात फटका बसत आहे. 

Web Title: Approval of private vehicles for passenger transport in Pune city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.