नवीन कोविड हॉस्पिटलकरिता १३० बेड खरेदीस मान्यता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:09 AM2021-06-04T04:09:12+5:302021-06-04T04:09:12+5:30
पुणे : बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ३३ मध्ये उभारण्यात येणाऱ्या महापालिकेच्या नवीन कोविड हॉस्पिटलमध्ये १३० फॉऊलर बेड सीएसआर फंडातून ...
पुणे : बाणेर येथील सर्व्हे क्रमांक ३३ मध्ये उभारण्यात येणाऱ्या महापालिकेच्या नवीन कोविड हॉस्पिटलमध्ये १३० फॉऊलर बेड सीएसआर फंडातून खरेदी करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली आहे.
पुणे महापालिकेकडे मेइमरसन एक्सपोर्ट इंजिनिअरिंग सेंटर या कंपनीने त्यांच्या सीएसआर फंडातून जमा केलेल्या रकमेतून ही खरेदी करण्यात येणार आहे. या बेड खरेदीकरिता १२ लाख ३५ हजार रुपये खर्च येणार आहे. महापालिकेच्या या नव्या हॉस्पिटलमध्ये एकूण १५० फॉऊलर बेडची आवश्यकता आहे. यापैकी २० फॉऊलर बेड सीएसआर फंडातून यापूर्वीच उपलब्ध झाले आहेत. सदर सहा मजली रुग्णालयातील विविध पायाभूत सुविधांवर साधारणत: ११ कोटी ५९ लाख १२ हजार रुपये खर्च येणार आहे. हा खर्च विविध उद्योजक, विकसक यांच्या सीएसआर फंडातून उपलब्ध निधीतून तसेच महापौर निधी व अन्य निधीमधून उपलब्ध केला जाणार आहे.