राजीव गांधी रुग्णालयाच्या कामासाठी १ कोटी ६३ रुपयांच्या निधीला मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2021 04:09 AM2021-06-30T04:09:03+5:302021-06-30T04:09:03+5:30
यासोबतच दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी ११ हजार रेमडेसिविर खरेदी केल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित ...
यासोबतच दुसऱ्या लाटेमध्ये मोठ्या प्रमाणावर पालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील रुग्णांसाठी ११ हजार रेमडेसिविर खरेदी केल्या होत्या. जिल्हाधिकाऱ्यांनी निर्देशित केलेल्या किरकोळ-घाऊक व्यापाऱ्यांकडून केलेल्या दोन कोटी रुपयांपर्यंतची खरेदीची बिले अदा करण्यास स्थायीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे.
पथारी व्यावसायिकांचे भाडे माफ करण्याचा प्रस्ताव अभिप्रायसाठी पाठविण्यात आला आहे. कोरोनामुळे मागील दीड वर्षापासून पथारी व्यावसायिकांना अडचणींचा सामना करावा लागला आहे. त्यांना लॉकडाऊन काळातील भाडे आणि त्यावरील दंड भरण्याच्या नोटिसा पालिकेने पाठविल्या आहेत. हे भाडे आणि दंड माफ करण्याचा प्रस्ताव नगरसेवक डॉ. सिद्धार्थ धेंडे यांनी दिला होता. तसेच, पथारी व्यावसायिक, गाळेधारक, पार्किंग, क्रीडासंकुल यांचे भाडे पालिकेने माफ करावे, असा प्रस्ताव विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ यांनी स्थायी समितीपुढे ठेवला होता. हा प्रस्ताव अभिप्रायासाठी पाठविला आहे.