महापालिकेच्या हद्दीत पीएमआरडीएला काम करण्यास मान्यता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 5, 2018 12:46 PM2018-12-05T12:46:21+5:302018-12-05T12:46:35+5:30
पीएमआरडीएच्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम करण्यात येणार आहे.
पुणे : पुणेमेट्रोच्या हिंजवडी ते शिवाजीनगर या तिसºया प्रकल्पाचे काम पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) मार्फत करण्यात येणार आहे. हे काम करताना महापालिकेच्या हद्दीत काम करण्यासाठी पीएमआरडीएला स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली असल्याची माहिती अध्यक्ष योगेश मुळीक यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पीएमआरडीएच्या वतीने हिंजवडी ते शिवाजीनगर या मेट्रोचे काम करण्यात येणार आहे. हे काम करताना प्रस्तावित स्थानके व मुख्य रस्त्यांना जोडणाऱ्या जिन्यांचे स्थान नकाशावर दर्शविल्याप्रमाणे मुख्य रस्त्याला जोडण्यासाठी परवानगी, प्रस्तावित मेट्रोसाठी सर्वसाधारण मार्गिका रुंदी जागा उपलब्धता अंतिम विकास आराखड्यातील रस्त्यामध्ये रेषेप्रमाणे जागा उपलब्ध करून देणे, महापालिका हद्दीतील रस्त्याखालील जागा विनामोबदला, विनाअडथळा उपलब्ध करूने देणे व स्टेशन जिन्यासाठी आवश्यक जागा, महापालिकेच्या मालमत्ता व व्यवस्थापन विभागाकडून योग्य त्या मोबदल्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणास मालकी हक्काने हस्तांतरीत करणे, या प्रकल्पासाठी महापालिका हद्दीतील आवश्यक खाजगी जमिनीचे संपादन आवश्यक तेथे एफएसआय किंवा टीडीआर स्वरुपात आणि जेथे एफएसआय किंवा टीडीआर स्वरूपात जागा ताब्यात येणार नाही तेथे पीएमआरडीएच्या खर्चाने करणे. पुणे महापालिकेच्या अंतिम विकास आराखड्यातील प्रस्तावित रस्ता रुंदीनुसार जागा उपलब्ध करून देणे, पुणे विद्यापीठ चौकातील एचसीएमटीआरच्या आखणीच्या ठिकाणी सुयोग्य नियोजन करुन देणे, या कामामुळे बाधित होणाऱ्या सेवा वाहिन्यांचे स्थलांत पीएमआरडीएने स्वखर्चाने व संबंधित विभागांच्या मार्गदर्शन व देखरेखीखाली करणे, मेट्रो तीन प्रकल्पामधून मेट्रो एक व मेट्रो २ प्रकल्पांपर्यंत वाहतूक संक्रमण व्यवस्था कामे पीएमआरडीएच्या खर्चाने करणे, मेट्रो प्रकल्प पूर्ण करण्यासाठी लगतच्या आवश्यक त्या परवानग्या पीएमआरडीएने स्वखर्चाने घेणे, तांत्रिक निकषांनुसार व आवश्यकतेनुसार हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यानच्या मेट्रो मार्गामध्ये आवश्यक ते फेरबदल तसेच मान्य विकास आराखड्यातील रस्त्याच्या आखणी व्यतिरिक्त आवश्यकतेनुसार मेट्रो मार्ग आखणी करणे, प्रस्तावित मेट्रो तीन मार्गाच्या आखणीबाबत टीओडी धोरणाबाबत शासनाच्या आदेशानुसार कार्यवाही करणे, आदी कामांसाठी स्थायी समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.