‘सरस्वती मंदिर संस्थे’ला स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून अ‍ॅप्रूव्ह्ड पार्टनरचा दर्जा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 12, 2018 01:08 PM2018-01-12T13:08:49+5:302018-01-12T13:12:20+5:30

सरस्वती मंदिर संस्थेला स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) कडून अ‍ॅप्रूव्ह्ड पार्टनरचा दर्जा देण्यात आला आहे. एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत कृष्णा यांच्या हस्ते सरस्वती मंदिर संस्थेचे चेअरमन विनायक आंबेकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले.

Approved partner's status by 'Skill Development Corporation' for Saraswati Mandir Sanstha | ‘सरस्वती मंदिर संस्थे’ला स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून अ‍ॅप्रूव्ह्ड पार्टनरचा दर्जा

‘सरस्वती मंदिर संस्थे’ला स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनकडून अ‍ॅप्रूव्ह्ड पार्टनरचा दर्जा

Next
ठळक मुद्देसंस्था गेल्या ९७ वर्षांपासून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना देत आहे शिक्षण सुविधाएनएसडीसीचे जयंत कृष्णा यांच्या हस्ते संस्थेचे चेअरमन विनायक आंबेकर यांना प्रमाणपत्र

पुणे : सरस्वती मंदिर संस्थेला स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एनएसडीसी) कडून अ‍ॅप्रूव्ह्ड पार्टनरचा दर्जा देण्यात आला आहे. नवी दिल्ली येथे एनएसडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी जयंत कृष्णा यांच्या हस्ते सरस्वती मंदिर संस्थेचे चेअरमन विनायक आंबेकर यांना प्रमाणपत्र देण्यात आले.
सरस्वती मंदिर संस्था गेल्या ९७ वर्षांपासून आर्थिक दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या शिक्षण सुविधा उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांना व्यासपीठ उपलब्ध होत आहे.
एनएसडीसी ट्रेनिंग पार्टनर या भूमिकेतून संस्था इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल, ब्यूटी अँंड वेलनेस, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी या सेक्टरमधील कोर्सेस उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. हे अभ्यासक्रम संपूर्ण देशभरातील फ्रँचाइसी सेंटर्समार्फत चालविण्याचा मानस असल्याचे संस्थेतर्फे सांगण्यात आले आहे.

Web Title: Approved partner's status by 'Skill Development Corporation' for Saraswati Mandir Sanstha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Puneपुणे