देशात १२२ वर्षांत एप्रिल महिना सगळ्यात उष्ण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 10:03 AM2022-05-05T10:03:42+5:302022-05-05T10:04:09+5:30

देशात बहुतेक रात्री नेहमीपेक्षा जास्त उष्ण ठरल्या

April is the hottest month in 122 years in the country heat wave weather department | देशात १२२ वर्षांत एप्रिल महिना सगळ्यात उष्ण

देशात १२२ वर्षांत एप्रिल महिना सगळ्यात उष्ण

Next

पुणे : भारतात गेल्या १२२ वर्षांत या वर्षीचा एप्रिल महिना हा सगळ्यात उष्ण होता, असे भारताच्या हवामान शास्त्रासंबंधी विभागाने (आयएमडी) आपल्या मासिक हवामान सारांशात म्हटले आहे. याच १२२ वर्षांत मार्च महिनाही सगळ्यात उष्ण राहिला होता.

देशात एप्रिल, २०२२ मध्ये मासिक कमाल सरासरी तापमान ३५.३ अंश सेल्सियस नोंदले गेले तर किमान तापमान ३३.९४ अंश सेल्सियस होते. १९०१ पासून दोन उष्ण एप्रिल महिने हे गेल्या दशकातील आहेत. वर्ष २०१० मध्ये मासिक सरासरी कमाल तापमान ३५.४२ अंश सेल्सियस तर २०१६ मध्ये ते ३५.३२ अंश सेल्सियस नोंद झाले. गेल्या महिन्यातील बहुतेक रात्री या देशात नेहमीपेक्षा जास्त उष्ण ठरल्या, असे विभागाकडील माहितीतून सूचित होते. यावर्षी एप्रिल महिन्यात मासिक सरासरी कमाल तापमान २३.५१ अंश सेल्सियस एवढे नोंदले गेले. हे तापमान सामान्य कमाल तापमानापेक्षा १.३६ अंश सेल्सियसने कमी होते व ही परिस्थिती १९०१ नंतर दुसऱ्यांदा आली आहे. एप्रिलमध्ये दीर्घकाळ राहिलेल्या उष्णतेच्या लाटांचा देशातील महत्वाच्या भागांत परिणाम झाला.

तापमान टाकले मागे
हिमाचल प्रदेश, ओडिशा, झारखंड, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्यप्रदेश, पंजाब, कर्नाटक आणि लक्ष्यद्वीप बेटे या हवामान स्थानकांनी एप्रिल महिन्यात त्यांच्या नेहमीच्या तापमानाला मागे टाकले. 

Web Title: April is the hottest month in 122 years in the country heat wave weather department

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.