पीएमपीकडून मनमानी वसुली

By admin | Published: November 25, 2015 01:11 AM2015-11-25T01:11:19+5:302015-11-25T01:11:19+5:30

पीएमपीएमएल कडून विमानतळासाठी सुरू करण्यात आलेल्या वातनातुकूतील बसेससाठी राज्यशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने तिकीट वसूली सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे

Arbitrary recovery from PMP | पीएमपीकडून मनमानी वसुली

पीएमपीकडून मनमानी वसुली

Next

पुणे : पीएमपीएमएल कडून विमानतळासाठी सुरू करण्यात आलेल्या वातनातुकूतील बसेससाठी राज्यशासनाचे नियम धाब्यावर बसवून मनमानी पध्दतीने तिकीट वसूली सुरू असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष म्हणजे, या बससेवेसाठी निविदा मागवून खासगी कंपनीच्या माध्यमातून ही सेवा पुरविली जात असल्याचे कारण पुढे करीत पीएमपी प्रशासनाने या प्रकारणातून हात झटकले आहेत. दरम्यान, या प्रकाराबाबत शहरातील स्वयंसेवी संस्थांनी याबाबतची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे केली असून ही अन्यायकारक दरवाढ रद्द करण्याची मागणी केली आहे. पीएमपीकडून या मार्गावर सध्या १० बसेस धावत आहेत. त्यामुळे या मार्गावर प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चांगलाच आर्थिक भूर्दंड सहन करावा लागत आहे.
राज्यशासनाने २० डिसेंबर २००५ मध्ये काढलेल्या एका आदेशानुसार, सार्वजनिक वाहतूकीसाठी जास्तीत जास्त किती तिकीटदर आकारता येईल, याचे निकष घालून दिले आहेत. त्यानुसार, २२ किलोमीटरसाठी ३० रुपये तर ३२ किलोमीटरसाठी ४२ रुपये दर निश्चित केलेला आहे. तर ही सुविधा वातानुकूलीत केल्यास त्यासाठी तिकिटावर १५० टक्के सरचार्ज आकारण्याची मुभा देण्यात आलेली आहे. या नियमानुसार, पीएमपीएमएल कोथरूड ते विमानतळासाठी ७५ रूपये आणि विमानतळ ते हिंजवडी या मार्गासाठी १०५ रुपये दर आकारू शकते. पण प्रत्यक्षात कोथरूडसाठी १२० तर हिंजवडीसाठी १८० रुपयांचे तिकीट आकारले जात आहे. त्यामुळे ही तिकीट वसूली अन्यायकारक असून त्याबाबत पीएमपीने खुलासा करण्याची मागणी केली असल्याचे परिसर संस्थेचे रणजीत गाडगीळ यांनी सांगितले. या बाबतची तक्रार पीएमपी प्रशासनाकडे दिली असून सोबत राज्यशासनाच्या आदेशाची प्रत जोडण्यात आली आहे. हा निर्णय राज्यातील सर्व सार्वजनिक वाहतूक व्यवस्थांसाठी आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Arbitrary recovery from PMP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.