बेलगामपणाला लागला चाप
By admin | Published: December 10, 2014 12:11 AM2014-12-10T00:11:12+5:302014-12-10T00:11:12+5:30
राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे बेलगाम झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची प्रतिमा वादग्रस्त अधिकारी अशी आहे.
Next
पिंपरी : राजकीय वरदहस्त लाभल्यामुळे बेलगाम झालेले पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांची प्रतिमा वादग्रस्त अधिकारी अशी आहे. त्यांच्याविरोधात पदाधिका:यांपासून कर्मचारी-अधिका:यांच्याही तक्रारी आहेत. परंतू, पद आणि राजकारण्यांनी दिलेले बळ यामुळे उघडपणो तक्रारी कोण करत नव्हते. मात्र दरोडय़ाचा गुन्हा खंडाळा पोलीसांनी मंगळवारी दाखल केल्याने आता शिंदे यांच्याविरोधात महापालिकेशी संबधीत अनेकजण उघडपणो बोलू लागले आहेत.
सातारा जिल्ह्यातील वडवाडी-शिरवळ येथे शासनाची पिवळा दिवा असलेली मोटार घेऊन जात तेथील शेतक:यांना जमीनीच्या वादातून धमकावल्याबद्दल खंडाळा पोलिसांनी मंगळवारी शिंदे यांच्यावर दरोडय़ाचा गुन्हा दाखल केला. या निमित्ताने जकात अधीक्षक ते अतिरिक्त आयुक्त असा प्रवास असणा:या शिंदे यांचे कारनामे आता उघड होतील, अशी चर्चा महापालिका वतरूळात होती.
जकात अधिक्षक, भूमी जिंदगी विभागाचे सहायक आयुक्त पद भूषविल्यानंतर 28 जून 2क्13 ला अतिरिक्त आयुक्त म्हणून शिंदे यांची नियुक्ती झाली होती. महापालिकेत त्यांचे नाव विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे. राष्ट्रवादीचे नेते आणि स्थानिक नेत्यांशी त्यांचे घरोब्याचे ‘व्यावसायिक हित संबंध’ आहेत. लोकसभा निवडणूकीपूर्वी शिंदेंना महापालिकेत आणण्यासाठी एका वजनदार नेत्याने लॉबिंग केले होते.
अतिरिक्त आयुक्तपदी रूजू झाल्यानंतर त्यांच्या कक्षात बिल्डर, जमीन खरेदी विक्री करणारांचाच राबता असायचा. कार्यालयात बसून ते मावळ, मुळशी, खेडमधील शेतक:यांना बोलवून दमबाजी करीत असल्याच्या तक्रारीही यापूर्वी शेतक:यांनी केलेल्या आहेत. फुकटचा फौजदार म्हणूनही त्यांना ओळखले जायचे. राजकीय वरदहस्त असल्याने त्यांच्या विरोधात ब्र काढायलाही महापालिकेतील इतर अधिकारी धजावत नसत. निविदा प्रक्रियेत असणारी अधिकारी नगरसेवक यांच्यातील रिंग यामध्येही ते महत्त्वाची भूमिका बजवीत असल्याच्या तक्रारी विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी केल्या होत्या. लोकसभा निवडणुकीच्या कालखंडात मावळ मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी पदाची जबाबदारी असताना त्यांच्या कार्यपद्धतीविषयी राष्ट्रवादी काँग्रेसशिवाय इतर उमेदवारांनी निवडणूक आयुक्तांकडे तक्रार केली होती. तसेच उमेदवारी अर्ज भरताना, निवडणूक निर्णय अधिका:यांच्या कक्षात उमेदवार व त्यांचे प्रतिनिधी यांना सोडण्यात पक्षपातीपणा करीत होते. डमी उमेदवार निवडणूकीत उतरविण्याविषयी महत्त्वाची भूमिका बजावल्याचा आरोप त्यांच्यावर झाला होता. निवडणूक निर्णय अधिका:यांच्या कक्षात सोडण्यावरून त्यांच्याशी पत्रकारांशीही शाब्दिक वादावादी झाली होती. अतिरिक्त आयुक्तांच्या वाहनाला पिवळा दिवा लावण्याची परवानगी नाही. मात्र, केवळ अगिAशामक विभागाचा कार्यभार त्यांच्यावर असल्याने गाडीला पिवळा दिवा लावून ते ग्रामीण भागात फिरत असल्याचे यापूर्वीही आढळून आले होते. शिंदे यांना असलेले राजकीय बळ पाहून आयुक्त राजीव जाधव यांनी बोटचेपेपणाची भूमिका घेतली. याचमुळे त्यांचे शिंदे यांचा बेलगामपणा वाढला होता. मात्र आता दरोडय़ाचा गुन्हा दाखल झाल्यामुळे चाप बसेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
पदाचा गैरवापर करणा:या अतिरिक्त आयुक्त तानाजी शिंदे यांना तातडीने निलंबित करावे, अशी मागणी अवघ्या तीनच दिवसांपूर्वी ‘आम आदमी’ पक्षाचे ज्येष्ठ कार्यकर्ते मारुती भापकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. शिंदे यांच्या कार्यकालात झालेल्या निविदा प्रक्रिया, दिलेले ठेके संशयास्पद आहे. त्यांनी घेतलेल्या निर्णयांची व मालमत्तेची ‘सीआयडी’तर्फे चौकशी करावी, असेही या पत्रत म्हटले आहे.दरम्यान, शेतक:यांना ंिशंदे यांनी केलेल्या मारहाणीचा निषेध मराठी साम्राज्य सेनेच्या वतीने सागर मंटगीकर यांनी पत्रकाव्दारे केला आहे.