आर्किटेक्चर प्रवेश अर्जास रविवारपर्यंत मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 9, 2020 04:10 AM2020-12-09T04:10:40+5:302020-12-09T04:10:40+5:30
पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बॅचरल आॅफ आर्किटेक्चर (बी-आर्च) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात ...
पुणे : राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे (सीईटी सेल) बॅचरल आॅफ आर्किटेक्चर (बी-आर्च) अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले असून विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी येत्या रविवारपर्यंत (दि.१३) आॅनलाइन अर्ज करता येणार आहे.
सीईटी सेलने प्रसिध्द केलेल्या वेळापत्रकानुसार विद्यार्थ्यांना येत्या १४ डिसेंबरपर्यत कागदपत्रांची पडताळणी करून अर्ज कन्फर्म करावा लागेल.तसेच या प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या फेरीची अंतिम गुणवत्ता यादी २० डिसेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. त्याचप्रमाणे १३ डिसेंबरनंतर प्रवेशासाठी अर्ज करणा-या विद्यार्थ्यांना ‘ नॉन कॅप’ साठी ग्राह्य धरले जाणार असल्याचे सीईटी सेलकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
--------------------------
प्रवेशाचे वेळापत्रक
- येत्या १६ डिसेंबर रोजी प्राथमिक गुणवत्ता यादी प्रसिध्द होणार
- विद्यार्थ्यांना १७ आणि १८ डिसेंबर रोजी यादीवर आक्षेप नोंदविता येणार
-अंतिम गुणवत्ता यादी २० डिसेंबर रोजी जाहीर होणार
विद्यार्थ्यांना २१ ते २३ डिसेंबरपर्यंत महाविद्यालयांचे पर्याय निवडता येतील
प्रवेशाची निवड यादी २६ डिसेंबर रोजी जाहीर होणार
-विद्यार्थ्यांना २७ ते २९ डिसेंबर कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागणार
-----------------------------------------