Mahadev jankar, Gopichand Padalkar हे आरक्षणाच्या विरोधात आहेत का? अण्णा डांगेचा सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2021 11:45 AM2021-10-05T11:45:25+5:302021-10-05T11:45:31+5:30

आदिवासींमध्ये समावेश नको तर त्यांच्यासारख्या योजना लागू करा - महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण परिषदेची मागणी

Are Mahadev Jankar and Gopichand Padalkar against dhangar reservation Anna Dange's question | Mahadev jankar, Gopichand Padalkar हे आरक्षणाच्या विरोधात आहेत का? अण्णा डांगेचा सवाल

Mahadev jankar, Gopichand Padalkar हे आरक्षणाच्या विरोधात आहेत का? अण्णा डांगेचा सवाल

googlenewsNext
ठळक मुद्दे 'धनगर आणि आदिवासी समाजात भांडणे लावण्याचा प्रयत्न सुरु', डांगेंचा आरोप

पुणे : महाराष्ट्र धनगर समाज महासंघाच्या वतीने पुण्यात ‘धनगर आरक्षण परिषदे’चे आयोजन करण्यात आले होते. महादेव जानकर, गोपीचंद पडळकर यांना आम्ही निमंत्रण दिले होते. तरीही ते आज आले नाहीत. त्यांची भूमिका आपल्या विरोधात असल्याचे समजते आहे. आमची मूळ मागणी आरक्षणाची आहे. जानकर-पडळकर हे आरक्षणाच्या विरोधात आहे का, हे एकदा त्यांनी समाजाला सांगावे. असा सवाल महाराष्ट्र धनगर समाज आरक्षण परिषदेचे निमंत्रक अण्णा डांगेंनी परिषदेत उपस्थित केला आहे. तर धनगर आरक्षणाच्या या लढाईत जे येतील त्यांच्यासह आणि जे येणार नाही त्यांच्याशिवाय लढाई आपण करू, असा निर्धारही त्यांनी केला आहे.

यावेळी राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, माजी मंत्री राम शिंदे, खासदार विकास महात्मे, माजी आमदार रामहरी रूपनवर, माजी आमदार प्रकाश शेंडगे, माजी आयपीएस अधिकारी मधू शिंदे, पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते, प्रवीण काकडे, नवनाथ पडळकर, लक्ष्मण हाके उपस्थित होते.

''लोकसभेत आदिवासी समाजाचे ६० खासदार आहेत. धनगर समाजाला आदिवासी समाजात (एसटी) आरक्षण देऊ नये म्हणून ते केंद्र सरकारवर दबाव आणत आहेत. त्यामुळे केंद्र सरकारने हा विषय बाजूला ठेवला आहे. मात्र, आपली प्रमुख मागणी ही धनगर समाजाला आदिवासी समाजात घेण्याची नाही, तर आदिवासी समाजासारख्या सर्व सोयीसुविधा धनगर समाजाला लागू करण्याची आहे. काही जण त्याचा चुकीचा अर्थ लावून धनगर आणि आदिवासी समाजात भांडणे लावत आहेत, ही बाब सर्वांनी समजून घ्यावी, असे आवाहनही डांगे यांनी यावेळी केला आहे.

दोन्ही सरकारला सांगा

जातनिहाय जनगणना झाली पाहिजे, हे या दोन्ही सरकारला सांगा. कारण जातनिहाय जनगणना झाल्याशिवाय समाजाची लोकसंख्या कळणार नाही. तोपर्यंत धनगर आरक्षणाची मागणी पुढे जाणार नाही. जातनिहाय जनगणनेला विरोध करणाऱ्यांना मतदान मागायला घरी आल्यास उभे करू नका, असे आवाहन डांगे यांनी केले.

Web Title: Are Mahadev Jankar and Gopichand Padalkar against dhangar reservation Anna Dange's question

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.