पुणेकर महापालिकेतील भाजपच्या कारभारावर समाधानी आहेत का? पोटनिवडणुकीत कळणार

By ऑनलाइन लोकमत | Published: February 16, 2023 02:39 PM2023-02-16T14:39:29+5:302023-02-16T14:47:29+5:30

पोटनिवडणुकीचा निकाल आगामी महापालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठीची लिटमस टेस्ट ठरणार

Are Punekars satisfied with BJP administration in Municipal Corporation It will be known in the by-election | पुणेकर महापालिकेतील भाजपच्या कारभारावर समाधानी आहेत का? पोटनिवडणुकीत कळणार

पुणेकर महापालिकेतील भाजपच्या कारभारावर समाधानी आहेत का? पोटनिवडणुकीत कळणार

googlenewsNext

हणमंत पाटील 

पिंपरी : कसबा व चिंचवड पोटनिवडणूक महापालिका निवडणुकीच्या तोंडावर होत आहे. त्यामुळे भाजप, राष्ट्रवादी, काँग्रेस व शिवसेनेच्या नेत्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दोन्ही शहरातील महापालिकांमध्ये पाच वर्षांत भाजपची सत्ता होती. त्यांच्या कारभाराविषयी जनतेच्या मनात काय कौल आहे.  यासाठी ही पोटनिवडणूक रंगीत तालीम ठरणार आहे.

पुणे व पिंपरी महापालिकेतील राष्ट्रवादीची सत्ता जाऊन दोन्ही ठिकाणी भाजप सत्तेत होते. या काळात मेट्रो, स्मार्ट सिटी असे मोठे प्रकल्प येथे सुरू झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते दोन्ही प्रकल्पांची सुरुवात धूमधडाक्यात पुण्यातून झाली. त्यानंतर पाच वर्षांत प्रायोगिक तत्त्वावरील केवळ पिंपरी ते फुगेवाडी आणि गरवारे ते वनाज एवढाच मेट्रोचा टप्पा सुरू झाला. तसेच, दोन्ही शहरांत स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत स्मार्ट पदपथ, भूमिगत केबल अशी काही कामे सुरू झाली आहे. मात्र, दोन्ही प्रकल्प अद्याप पूर्ण झालेले नाहीत.

जनतेचा कौल दाखविणारी निवडणूक...

मुळा, मुठा व पवना नदीसुधार प्रकल्पाचा केवळ आराखडा मंजूर झाला आहे. मात्र, कोणतेही काम पूर्ण झालेले दिसत नाही. झालेल्या कामांविषयी जनतेला काय वाटते, पुणेकर व पिंपरी-चिंचवडकर हे केंद्र, राज्य व महापालिकेतील भाजपच्या कारभारावर समाधानी आहेत का, याचा कौल दाखवणारी ही पोटनिवडणूक आहे. या निवडणुकीचा निकाल आगामी महापालिका, लोकसभा व विधानसभा निवडणुकीसाठीची लिटमस टेस्ट ठरणार आहे.

कसब्यातील नगरसेवक संख्या : १८

१) भाजप : १२
२) काँग्रेस : ०३
३) राष्ट्रवादी : ०२
४) शिवसेना : ०१

चिंचवडची नगरसेवक संख्या : ५३

१) भाजप : ३४
२) राष्ट्रवादी : ०९
३) शिवसेना : ०६
४) अपक्ष : ०४

Web Title: Are Punekars satisfied with BJP administration in Municipal Corporation It will be known in the by-election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.