Mutha Canal : आमच्या जीवाची किंमत काहीच नाही का : नागरिकांचा आर्त सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 04:54 PM2018-09-27T16:54:05+5:302018-09-27T16:58:46+5:30
पुणे शहरातील दांडेकर पूल भागात फुटलेला मुठा कालवा जर रात्री फुटला असता तर काय केले असते असा सवाल इथले रहिवासी विचारत आहेत.
पुणे : पुणे शहरातील दांडेकर पूल भागात फुटलेला मुठा कालवा जर रात्री फुटला असता तर काय केले असते असा सवाल इथले रहिवासी विचारत आहेत.
गुरुवारी सकाळी दांडेकर पुलाजवळील मुठा नदीचा कालवा फुटला. संबंधीत कालवा फुटून काही मिनिटात पाण्याचा मोठा प्रवास दांडेकर पुलाजवळील झोपडपट्टी भागात शिरला आणि सारे होत्याचे नव्हते झाले.एकमेकांना हात देऊन नागरिक बाहेर निघाले.आत अडकलेल्या अनेकांना अग्निशमन दल आणि स्थानिक नागरिकांनी दोरीच्या साहाय्याने बाहेर काढले.यात स्थानिक नागरिक सोबत असल्याने अरुंद गल्ल्या, बोळी आणि घरे अग्निशमन दलाला सापडली.
मात्र ही दुर्घटना रात्री घडली असती तर काय झाले असते असा सवाल स्थनिक नागरिक विचारत होते. झोपडपट्टीत राहणारे माणसेही माणसेच आहेत.त्यांनाही जीव आहेत.असा कालवा जवळ असताना पाटबंधारे विभाग काहीही करत नसेल तर मात्र आमचे जीव स्वस्त झालेत अशी प्रतिक्रिया या भागातील नागरिक नोंदवत आहेत.सुमारे 18 वर्षांपूर्वी इथे भिंत बांधण्यात आली होती.आज आलेल्या पाण्यामुळे भिंत निम्मी वाहत गेली. त्यामुळे कुठली भिंत आणि कसले घर असा प्रश्न इथले रहिवासी विचारत आहेत.