Pune 14 year girl murder case: महिला बालकल्याण मंत्री आहेत का? रुपाली पाटील यांचा संतप्त सवाल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2021 12:33 PM2021-10-13T12:33:31+5:302021-10-13T12:44:08+5:30

rupali patil questioning yashomati thakur: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून महिला बालकल्याण मंत्री आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे.

Are women child welfare ministers Angry question of Rupali Patil | Pune 14 year girl murder case: महिला बालकल्याण मंत्री आहेत का? रुपाली पाटील यांचा संतप्त सवाल

Pune 14 year girl murder case: महिला बालकल्याण मंत्री आहेत का? रुपाली पाटील यांचा संतप्त सवाल

googlenewsNext
ठळक मुद्देमहाराष्ट्राच नाक, सांस्कृतिक नगरीत कोयत्याने सामूहिक गळा चिरण्याची हिम्मत कशी होते

पुणे : पुणे शहरात आठवीमध्ये शिकणाऱ्या एका चौदा वर्षीय मुलीचा कोयत्याने सपासप वार करून खून करण्यात आला. या घटनेनं संपूर्ण पुणे हादरले आहे. त्यामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली असून आरोपींवर कठोर कारवाई व्हावी. अशी मागणीही सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय नेते यांच्याकडून होत आहे. अजित पवारांनीसुद्धा आरोपींवर कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या रुपाली पाटील यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून  महिला बालकल्याण मंत्री आहेत का? असा सवाल उपस्थित केला आहे.

पाटील म्हणाल्या,  माजी लपले तर आजी झोपले? महिला बालकल्याण मंत्री आहेत का? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे. तर आता या घटनेबाबत महिला आयोगाला मुहूर्त हवा का? असा खोचक सवालही पाटील यांनी उपस्थित केला आहे.  

''महाराष्ट्राच नाक, सांस्कृतिक नगरीत कोयत्याने सामूहिक गळा चिरण्याची हिम्मत कशी होते? जरा लाजा वाटुद्या .पुण्यात १४ वर्षीय कबड्डी खेळाडू मुलीचा एकतर्फी प्रेमात निर्घृण खून होतो पुण्य नगरीच्या लेकीला न्याय कधी मिळणार? सदरील प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवून, आरोपीला शिक्षा व्हावी व अशा प्रकरणात आरोपीचे वकीलपत्र घेताना वकिलांनी ही सर्व सत्य बाजू तपासून वकीलपत्र घ्यावे. असही त्यांनी सांगितलं आहे.'' 

''पुण्यात 14 वर्षीय कबड्डी खेळाडू मुलीचा एकतर्फी प्रेमात  निर्घृण खून करणाऱ्या नराधमाचे आरोपीचे वकील पत्र कोणीही घेऊ नये ही विनंती वकील बंधू,भगिनींना आरोपींना फास्ट ट्रॅक केस चालवून लवकर शिक्षा व्हावी, हीच त्या लेकराला श्रद्धांजली असेल असंही त्या म्हणाल्या आहेत.''

रुपाली पाटील यांची फेसबुक पोस्ट 

''माजी लपले तर आजी झोपले? महिला बालकल्याण मंत्री आहेत का? महिला आयोगाला मुहूर्त हवा का # 
महाराष्ट्राच नाक, सांस्कृतिक नगरीत कोयत्याने सामूहिक गळा चिरण्याची हिम्मत कशी होते? लाजा वाटुद्या #
पुण्यात 14 वर्षीय कबड्डी खेळाडू मुलीचा एकतर्फी प्रेमात  निर्घृण खून, पुण्य नगरीच्या लेकीला न्याय कधी ?
सदरील प्रकरण फास्ट ट्रक कोर्टात चालवून, आरोपीला शिक्षा व्हावी व अशा प्रकरनात आरोपीचे वकीलपत्र घेताना वकिलांनी ही सर्व सत्य बाजू तपासून वकीलपत्र घ्यावे.''

एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता 

क्षितिजा अनंत व्यवहारे (वय 14) असे खून झालेल्या मुलीचे नाव आहे. ती कबड्डीपटू होती. काल सायंकाळी ती मित्र मैत्रिणी सोबत कबड्डीचा सराव करत होती. ज्या वेळी त्या ठिकाणी आलेल्या एका तरुणाने तिला बाजूला घेऊन तिच्याशी बोलण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्यात वाद झाला आणि सोबत आणलेल्या कोयत्याने आरोपीने क्षितिजाच्या गळ्यावर सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या क्षितीजाचा जागेवरच मृत्यू झाला. आरोपीने अत्यंत क्रूरपणे हा गुन्हा केलाय. त्यानंतर त्याने घटनास्थळीच कोयता आणि सोबत आणले शस्त्र टाकून देऊन पळ काढला.  दरम्यान आरोपी जवळ पिस्तूल देतील असल्याची माहिती समोर येत आहे. परंतु गुन्हा करत असताना त्याला ते काढता आले नाही. एकतर्फी प्रेमातून हा प्रकार झाला असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: Are women child welfare ministers Angry question of Rupali Patil

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.