खरंच स्त्रिया इतक्या दुष्ट असतात का?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:12 AM2021-02-14T04:12:28+5:302021-02-14T04:12:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : सध्याच्या दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका पाहिल्यानंतर प्रचंड चीड येते. प्रत्येक मालिकेमध्ये स्त्रियांना खलनायिका म्हणून सादर ...

Are Women Really So Wicked? | खरंच स्त्रिया इतक्या दुष्ट असतात का?

खरंच स्त्रिया इतक्या दुष्ट असतात का?

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : सध्याच्या दूरचित्रवाहिन्यांवरील मालिका पाहिल्यानंतर प्रचंड चीड येते. प्रत्येक मालिकेमध्ये स्त्रियांना खलनायिका म्हणून सादर केले जाते. स्त्रिया खरंच इतक्या दुष्ट असतात का? असा प्रश्न वाहिन्यांना विचारावासा वाटतो, अशा शब्दांत शांताबाई नारायणराव सावरकर यांच्या सून स्वामिनी विक्रम सावरकर यांनी वाहिन्यांवर टीका केली. आपल्या धर्माने स्त्रीचे रूप ‘अबला’ म्हणून नव्हे ‘आदर्श’ म्हणून समोर आणले आहे असेही त्या म्हणाल्या.

मृत्यूंजय प्रकाशनाच्या वतीने ‘तू धैर्याची अससी मूर्ती’ या कै. यशोदा गणेश सावरकर (येसूवहिनी) यांच्या पहिल्या साधार अधिकृत चरित्रात्मक पुस्तकाचा प्रकाशन सोहळा स्वामिनी विक्रम सावरकर आणि लेखिका शेफाली वैद्य यांच्या हस्ते पार पडला. यावेळी सावरकरांचे अभ्यासक अक्षय जोग, लेखिका अपर्णा चौथे व प्रकाशक सात्यकी सावरकर उपस्थित होते.

आजच्या राजकीय गदारोळात आपला पक्ष, त्यामागे दडलेला स्वार्थ अशी लोकं सापडतात पण त्यामध्येही काही अपवाद असतात. सध्याची अंदाधुंद परिस्थिती असली तरी कणखर सावरकर प्रेमी आशावादी आहेत. आजची तरुण पिढी सक्रिय झाली आहे. ही पिढी विचारशील आहे. आपण त्यांना सकस साहित्य पुरवित राहिल्यास त्यातून सक्षम पिढी घडेल, असा विश्वास स्वामिनी सावरकर यांनी व्यक्त केला. तसेच यशोदा सावरकर खूप हलाखीच्या स्थितीत राहिल्या तरी त्या ‘अबला’ नव्हत्या असेही त्या म्हणाल्या.

आज कितीतरी स्त्रिया अशा आहेत की इतिहासाने नोंद घेतली नाही त्यांच्या वेदना मूक राहिल्या, असे सांगून शेफाली वैद्य म्हणाल्या, हिंदुत्त्ववादी विचारांची इको सिस्टीम बनली पाहिजे, असे आपण म्हणतो पण जोपर्यंत स्वत: अशा प्रकारची पुस्तके काढत नाही तोपर्यंत इको सिस्टीम तयार होणार नाही.

अक्षय जोग आणि सात्यकी सावरकर यांनी आपली मनोगते व्यक्त केली. अपर्णा चौथे यांनी पुस्तकामागील भूमिका स्पष्ट केली. अक्षय वाटवे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

-----------------------------------------

Web Title: Are Women Really So Wicked?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.