गणित विषयाची भीती वाटते का ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:10 AM2021-03-19T04:10:30+5:302021-03-19T04:10:30+5:30
शनिवारी २० मार्च रोजी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी ६ वाजता लोकमत इव्हेंटफुल पेजवर लाईव्ह पुणे : लहानपणापासून ...
शनिवारी २० मार्च रोजी १२ वीच्या विद्यार्थ्यांसाठी संध्याकाळी ६ वाजता लोकमत इव्हेंटफुल पेजवर लाईव्ह
पुणे : लहानपणापासून गणित या विषयाबद्दल मुलांच्या मनात भीती निर्माण झालेली असते. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना याविषयीची धास्ती वाटत असते. मनावर एकप्रकारचे दडपण देखील आलेले असते. १० वीच्या वर्गानंतरही हे दडपण गेलेले नसते. आता मात्र १२ वी ला असणाऱ्या विद्यार्थ्यांना हे दडपण घेण्याची गरज नाही. त्यांना ‘लोकमत’तर्फे मार्गदर्शन मिळणार आहे.
१२ वीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेत गणिताचा ताण न घेता पेपर सोडविता येणार आहे. कारण, याबद्दल प्रसिद्ध गणित विशेषज्ञ उदय कुमार ह्यांचे मोलाचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना मिळणार आहे. कठीण फॉर्म्युला किचकट धड्यां मागचे सोपे रहस्य या मार्गदर्शनातून मिळणार आहे. त्यामुळे कमी वेळात व स्मार्ट पद्धतीने गणित सोडविता येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांची परीक्षापूर्वीची भीती दूर होणे शक्य होणार असून त्यांचा आत्मविश्वास वाढला जाईल. तसेच परीक्षेचा ताण व गोंधळ दूर करण्यास १०० टक्के मदत होणार आहे.
--------
गणिताविषयी वाटणारी भीती दूर करायची असेल, तर प्रसिद्ध गणित विशेषज्ञ उदय कुमार यांचे मार्गदर्शनासाठी लाईव्ह या, शनिवारी दिनांक २० मार्च रोजी संध्याकाळी ६ वाजता फक्त लोकमत इव्हेंटफुल पेजवर .
---------