कानगावला शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

By admin | Published: December 19, 2015 03:02 AM2015-12-19T03:02:52+5:302015-12-19T03:02:52+5:30

कानगाव येथील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी हिरडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील साईकृपा साखर कारखान्याच्या निषेधार्थ तिसऱ्या दिवशी अर्धनग्न उपोषण केले.

Argan movement of Kanagawa farmers | कानगावला शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

कानगावला शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन

Next

पाटस : कानगाव येथील ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी हिरडगाव (ता. श्रीगोंदा, जि. नगर) येथील साईकृपा साखर कारखान्याच्या निषेधार्थ तिसऱ्या दिवशी अर्धनग्न उपोषण केले.
साईकृपा कारखान्याने येथील जवळपास १०० शेतकऱ्यांचे उसाचे बिल न दिल्यामुळे संतप्त शेतकऱ्यांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. या साखर कारखान्याला शेतकऱ्यांचे बिल देण्यासाठी शासनाच्या माध्यमातूनच प्रयत्न होणार आहेत. कारण, मोठ्या मेहनतीने उसाचे पीक घेतले, त्यातच पैसे मिळणार नसतील तर या भागातील शेतकऱ्यांना कर्जाच्या खाईत जावे लागणार असल्याची भीती उपोषणकर्त्यांनी व्यक्त केली आहे. तेव्हा शासनाने याकामी तातडीने पुढाकार घेऊन या भागातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवावेत, अशी मागणी केली. तहसीलदार उत्तम दिघे, यवतचे पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक अजय गोरड, वैद्यकीय अधिकारी डॉ. रणजित कांबळे, मंडलाधिकारी भालेराव यांनी उपोषण स्थळी भेट दिली.

कानगावला आज शासनाचा दशक्रियाविधी
कानगाव येथील शेतकऱ्यांची हेळसांड करणाऱ्या साईकृपा कारखाना व्यवस्थापनाची गय केली जाणार नाही. जर शासन साईकृपा कारखान्याला पाठीशी घालत असेल, तर शासनाला
त्याची किंमत मोजावी लागेल. याचा एक भाग म्हणून कानगाव गावात शनिवारी (दि. १९) शासनाचा दशक्रियाविधी करण्यात येणार आहे. दोन दिवसांपूर्वी शासनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा गावातून काढण्यात आली होती. याचा विचार शासनाने करावा,
असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा प्रवक्ते भानुदास शिंदे
यांनी सांगितले.

Web Title: Argan movement of Kanagawa farmers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.