मानसिक रुग्णाला पाहण्यावरून झाला होता वाद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2021 04:08 AM2021-07-02T04:08:55+5:302021-07-02T04:08:55+5:30
डॉ. निखिल आणि डॉ. अंकिता हे दोघेही बीएमएस डॉक्टर होते. त्यांचे डिसेंबर २०१९ मध्ये विवाह झाला होता. ते दोघेही ...
डॉ. निखिल आणि डॉ. अंकिता हे दोघेही बीएमएस डॉक्टर होते. त्यांचे डिसेंबर २०१९ मध्ये विवाह झाला होता. ते दोघेही राहत असलेल्या इमारतीत शेंडकर क्लिनिक या नावाने वैद्यकीय व्यवसाय करीत होते. मागील ३ महिन्यांपासून निखिल यांनी यवत येथील कासुर्डीला क्लिनिक सुरू केले होते. ३० जूनला ते यवत येथे गेले असताना त्यांचा एक मानसिक रुग्ण त्यांना वारंवार फोन करत होता. या रुग्णाला पाहण्यासाठी त्यांनी अंकिता यांना फोन करून सांंगितले. त्यांनी रुग्णाला पाहण्यास नकार दिला. त्यावरून फोनवरून त्यांच्यात दुपारी ४ वाजता वाद झाला. त्यानंतर निखिल हे सायंकाळी सव्वापाच वाजता घरी आले. ते थेट तिसऱ्या मजल्यावरील त्यांच्या फ्लॅटवर गेले. पण आतून दरवाजा बंद होता. त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केल्यावर अंकिता हिने गळफास घेतल्याचे दिसून आले.
त्यानंतर आज १ जुलै रोजी सकाळी साडेसात वाजता निखिल यांनी आंघोळीला जातो, असे सांगून बाथरूमध्ये जाऊन ओढणीच्या सहाय्याने घरात गळफास लावून आत्महत्या केली. त्यापूर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहिली असून, त्यात त्यांनी त्याचे मरणास कोणालाही जबाबदार धरू नये, असे नमूद केले आहे.