‘अर्जुन मार्क २’ रणगाडा लष्करात दाखल होणार, २१ व्या तुकडीचे डॉ. ख्रिस्तोफर यांच्या उपस्थितीत उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2017 05:17 AM2017-10-23T05:17:36+5:302017-10-23T05:18:03+5:30

भारतीय बनावटीचा अर्जुन मार्क २ हा रणगाडा लष्करात दाखल होण्यास सज्ज असून लष्कराच्या सूचनेनुसार त्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. रणगाडा लष्करात दाखल झाल्यास याच्या दोन रेजिमेंट उभारण्याची तयारी असल्याची माहिती डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर यांनी दिली.

Arjun Marque 2 will be admitted to the Army, the 21st batch of Dr. Inauguration of Christopher's presence | ‘अर्जुन मार्क २’ रणगाडा लष्करात दाखल होणार, २१ व्या तुकडीचे डॉ. ख्रिस्तोफर यांच्या उपस्थितीत उद्घाटन

‘अर्जुन मार्क २’ रणगाडा लष्करात दाखल होणार, २१ व्या तुकडीचे डॉ. ख्रिस्तोफर यांच्या उपस्थितीत उद्घाटन

Next

पुणे : भारतीय बनावटीचा अर्जुन मार्क २ हा रणगाडा लष्करात दाखल होण्यास सज्ज असून लष्कराच्या सूचनेनुसार त्यात आवश्यक बदल करण्यात आले आहेत. रणगाडा लष्करात दाखल झाल्यास याच्या दोन रेजिमेंट उभारण्याची तयारी असल्याची माहिती डीआरडीओचे अध्यक्ष डॉ. एस. ख्रिस्तोफर यांनी दिली.
डिफेन्स इन्स्टिट्यूट आॅफ अ‍ॅडव्हान्स्ड टेक्नोलॉजी (डीआयएटी) येथील पोस्ट इंडक्शन ट्रेनिंग स्कूल अर्थात पॉईंट्स अभ्यासक्रमाच्या २१ व्या तुकडीचे उद्घाटन डॉ. ख्रिस्तोफर यांच्या उपस्थितीत झाले. या वेळी डीआरडीओच्या मनुष्यबळ विभागाच्या महासंचालक डॉ. हीना गोखले, डीआयएटीचे कुलगुरू डॉ. सुरेंद्र पाल, पॉईंट्सचे संचालक डॉ. आर. एन. प्रल्हाद उपस्थित होते.
अर्जुन मार्क २ च्या काही चाचण्यानंतर लष्कराने यात काही बदल करण्यास सांगितले होते. ते बदल पूर्ण करण्यात आले असून रणगाड्याची मारक क्षमत वाढली आहे. भारतीय लष्करातील रणगाडा रेजिमेंटने हा रणगाडा स्वीकारण्यास तयारी दाखवली आहे.
।डीआरडीओमधील पदे भरणार
डीआरडीओमध्ये मनुष्यबळाची कमतरता आहे. ती भरण्यासाठी प्रक्रिया सुरू आहे. सध्या डीआरडीओमध्ये प्राधान्याने ४०० जागा तातडीने भरल्या जाणार आहेत. उर्वरित काही पदे ही तीन टप्प्यांमध्ये भरण्यात येतील. याबाबतची माहिती पंतप्रधान कार्यालयाला द्यावी लागणार असून ते काम सध्या सुरू आहे.
नौदलाच्या मागणीनुसार ‘तेजस’मध्ये बदल करणार
तेजस हे भारतीय बनावटीचे हलके लढाऊ विमान हवाई दलात दाखल झाले आहे. मात्र, या विमानात एकच इंजिन असल्याने ते स्वीकारण्यास नौदलाने नकार दिला आहे, असे डॉ. ख्रिस्तोफर म्हणाले.

Web Title: Arjun Marque 2 will be admitted to the Army, the 21st batch of Dr. Inauguration of Christopher's presence

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.