शस्त्रे बाळगण्यास मनार्ई
By admin | Published: October 25, 2016 06:30 AM2016-10-25T06:30:36+5:302016-10-25T06:30:36+5:30
डिसेंबर ते फेबु्रवारीदरम्यान मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १० नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव दाभाडे, आळंदी, इंदापूर,
पुणे : डिसेंबर ते फेबु्रवारीदरम्यान मुदत संपणाऱ्या जिल्ह्यातील १० नगर परिषदांच्या सार्वत्रिक निवडणुका जाहीर झाल्या आहेत. यामध्ये बारामती, लोणावळा, दौंड, तळेगाव दाभाडे, आळंदी, इंदापूर, जेजुरी, जुन्नर, सासवड व शिरूर या नगर परिषदेचा समावेश आहे.
या निवडणुकीसाठी संपूर्ण पुणे जिल्ह्यात आचारसंहिता लागू झाली असून, संपूर्ण जिल्ह्यात त्याची कडक अंमलबजावणी करण्याचे आदेश आयोगाने दिले आहेत. पुणे ग्रामीण जिल्ह्यात या आदेशाच्या दिनांकापासून ते निवडणुकींचा निकाल जाहीर होईपर्यंत म्हणजेच १५ डिसेंबर अखेरपर्यंत स्वत:जवळ परवानाप्राप्त अग्नीशस्त्रे / हत्यारे दारूगोळा बाळगण्यास व बरोबर नेण्यास मनाई आहे.
राजेंद्र असे मुठे यांनी स्पष्ट केले.
(प्रतिनिधी)