ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रणासाठी १६ अधिकाऱ्यांची फौज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2021 04:09 AM2021-04-19T04:09:42+5:302021-04-19T04:09:42+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : शहरी भागासह आता ग्रामीण भागात आणि संपूर्ण जिल्ह्यातच कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत ...

An army of 16 officers to control the oxygen supply | ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रणासाठी १६ अधिकाऱ्यांची फौज

ऑक्सिजन पुरवठ्यावर नियंत्रणासाठी १६ अधिकाऱ्यांची फौज

Next

लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : शहरी भागासह आता ग्रामीण भागात आणि संपूर्ण जिल्ह्यातच कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड वेगाने वाढत आहे. यामुळेच रुग्णांचे हाॅस्पिटलमध्ये दाखल होण्याचे व त्यांना लागणाऱ्या ऑक्सिजन व रेमडेसिविर व अन्य औषधांची मागणी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. सध्या जिल्ह्यात ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक हाॅस्पिटलला तीन-चार दिवस ऑक्सिजन पुरवठा होत नसल्याचे समोर आले आहे. जिल्ह्यात ऑक्सिजनची निर्मिती पुरेशा प्रमाणात होत असली, तरी ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग सेंटरवर उशीर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. यामुळेच जिल्हाधिकारी डाॅ. राजेश देशमुख यांनी स्वतंत्र आदेश काढून ऑक्सिजन सिलेंडर रिफिलिंग सेंटरवर लक्ष ठेवून ऑक्सिजनचा पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्यासाठी तब्बल १६ वरिष्ठ अधिकाऱ्यांची फौज नियुक्त केली आहे.

पुणे जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागात मोठ्या प्रमाणात कोरोना विषाणूच्या संसर्गाचा प्रादुर्भाव होऊन रुग्ण संख्येमध्ये मोठी वाढ होत आहे. त्यामुळे पुणे जिल्ह्यातील कोविड रुग्णांवर उपचार करण्यासाठी मोठ्या प्रमाणात कोविड केअर सेंटर, कोविड हाॅस्पिटल, जम्बो कोविड सेंटरसह खासगी हाॅस्पिटल कार्यरत आहेत. या सर्व ठिकाणी ऑक्सिजन पुरवठा करण्यासाठी सिलिंडर्स त्याचप्रमाणे सक्षम यंत्रणा व पाईपलाईन करण्यात आलेली आहे.

ऑक्सिजन उपलब्ध करणे अत्यंत आवश्यक

कोविड रुग्णांवर वैद्यकीय उपचारा दरम्यान ऑक्सिजन उपलब्ध करून देणे अत्यंत आवश्यक आहे. जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलिंडर रिफिलिंग पुरवठा करणाऱ्या १६ वितरकांवर नियंत्रण ठेवण्यासाठी १६ अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामुळेच शहर आणि जिल्ह्यातील ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा सुरळीत होण्यास मदत होणार आहे.

Web Title: An army of 16 officers to control the oxygen supply

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.