जेजुरीत सेना-राष्ट्रवादी आघाडी, एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2017 01:23 AM2017-11-25T01:23:50+5:302017-11-25T01:24:35+5:30
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे.
जेजुरी : तीर्थक्षेत्र जेजुरी नगरपालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या पोटनिवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. आज शिवसेना-राष्ट्रवादी कॉँग्रेसची आघाडी झाली असून आघाडीच्या वतीने रेश्मा मनोज खोमणे यांनी उमेदवारी अर्ज भरला. आज अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस असून एकूण ७ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत.
या पोटनिवडणुकीत राज्यमंत्री विजय शिवतारे, आणि दिलीप बारभाई यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय अशी शहर विकास आघाडी स्थापन करीत असून आघाडीचा एकच उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असणार आहे, असे आघाडीचे प्रवर्तक दिलीप यादव यांनी यावेळी सांगितले.
याच बरोबर भाजपाच्या वतीने हेमंत अलका शिंदे यांनी भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब गरुड, नियोजन मंडळाचे सदस्य गिरीश जगताप, तालुका अध्यक्ष सचिन लंबाते, शहराध्यक्ष अशोक खोमणे, तालुका विस्तारक जीवन जाधव आदींच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. तरअड विजया वसंत नाझीरकर यांनी ही अपक्ष उमेदवारी दाखल केली आहे.
>काँग्रेसकडून दोन उमेदवारी अर्ज दाखल
जेजुरी : कॉँग्रेसच्या वतीने शहरातून मिरवणुकीने येऊन प्राजक्ता रवींद्र जोशी आणि रत्ना गणेश मुंडलिक यांचे उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. सत्तेचा गैरवापर करून नगराध्यक्षपदाच्या वीणा सोनवणे यांचा जातीचा दाखला अवैध ठरविण्यात आला. येत्या २९ तारखेला याचा निकाल होईलच. निकाल काहीही असो, आम्ही निवडणुकीची पूर्ण तयारी केलेली असून कोणीही, कोणत्याही आघाड्या केल्या तरी काँग्रेसचाच विजय निश्चित असल्याचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी सांगितले. जेजुरी पालिकेची नगराध्यक्षपदाची निवडणूक १३ डिसेंबर रोजी होणार आहे. नगराध्यक्षपदाचे आरक्षण हे नागरिकांचा मागास प्रवर्ग (इतर मागास महिला) असे आहे. कुमारी प्राजक्ता रवींद्र जोशी यांनी दोन अर्ज दाखल केले. कुमारी प्राजक्ता जोशी या २१ वर्षे पूर्ण असून सर्वांत तरुण उमेदवार आहेत. त्यांचे एम.बी.ए.चे शिक्षण सुरू आहे. दुसºयात उमेदवार रत्ना मुंडलिक या कॉँग्रेसच्या महिला अध्यक्षा आहेत.
>भाजपाच्या अर्जात नाव चुकले की चुकवले?
राज्यात व केंद्रात सत्तेत असणाºया भाजपाचा पालिका निवडणुकीत एकमेव उमेदवारी अर्ज अलका हेमंत शिंदे यांनी दाखल केला असला तरीही उमेदवारी अर्जात त्यांनी स्वत:चे नाव मात्र हेमंत अलका शिंदे असे लिहिलेले आहे. यामुळे भाजपावर नामुष्कीची वेळ आली असून एका राष्ट्रीय पक्षाच्या उमेदवाराच्या अर्जात नाव चुकलेले असल्याने मोठी चर्चा राजकीय वतुर्ळातून होत आहे.