लष्कर भरती प्रकरण; मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2021 04:12 AM2021-03-16T04:12:39+5:302021-03-16T04:12:39+5:30

थिरू मुरूगन थंगवेलू (वय ४७, रा. वेलिंगटन, राज्य तमिळनाडू), वसंत किलारी (वय ४५, रा. दिल्ली. मुळ रा. आंध्रप्रदेश) अशी ...

Army recruitment case; Increase in police custody of major rank officers | लष्कर भरती प्रकरण; मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ

लष्कर भरती प्रकरण; मेजर दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या पोलीस कोठडीत वाढ

Next

थिरू मुरूगन थंगवेलू (वय ४७, रा. वेलिंगटन, राज्य तमिळनाडू), वसंत किलारी (वय ४५, रा. दिल्ली. मुळ रा. आंध्रप्रदेश) अशी दोघांची नावे आहेत. याप्रकरणी इतर पाच जणांना अटक के आहे. आणखी तिघांवर गुन्हा दाखल केला आहे.

लष्कराच्या रिलेशन आर्मी अंतर्गत पुण्यासह देशात ४३ ठिकाणी सामाईक प्रवेश परीक्षा घेणार होती. या परीक्षेत देशभरातील ४० हजार उमेदवार बसले होते. मात्र, या परीक्षेची प्रश्नपत्रिका पुण्यात फुटली असल्याची माहिती लष्करी गुप्तचर (एमआय) विभागाने पुणे पोलिसांना दिली होती. त्यानुसार ही कारवाई करण्यात येत आहे. याप्रकरणी थंगवेलू आणि किलारी यांच्या पोलीस कोठडीची मुदत संपल्याने त्यांना पुन्हा न्यायालयात हजर केले. थंगवेलू याच्याकडे तपास केला असता प्रश्नपत्रिका देण्याच्या बदल्यात किलारी याला २५ लाख रुपये देण्याचे ठरले होते.

दरम्यान, विकाली याने प्रश्नपत्रिकेच्या बदल्यात पवन नायडू नावाच्या व्यक्तीला २५ लाख रुपये देण्याचे ठरले होते असे सांगण्यात येत आहे. त्याबाबत दोघांकडे तपास केला असता ते उपयुक्त माहिती देत नाहीत. थंगवेलू याला किलारी याने व्हाॅट्सअ‍ॅपवर प्रश्नपत्रिका पाठवल्या बाबत कबुली दिली आहे. मात्र, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मोबाइलमधील डाटा डिलीट केला असून, त्याबाबत तपास करायचा आहे. थंगवेलू आणि किलारी यांनी तमिळ भाषेत संभाषण केले आहे. सदर संभाषणाची क्लिप रिकव्हर केली आहे. त्याबाबत दोघांकडे तपास करायचा आहे. दोघांच्या मोबाइलमधील डिलीट केलेला डाटा रिकव्हर करायचा असल्याने त्यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याची मागणी सरकारी वकील प्रेमकुमार अगरवाल यांनी केली. त्यानुसार न्यायालयाने दोघांच्या कोठडीत वाढ करण्याचा आदेश न्यायालयाने दिला.

Web Title: Army recruitment case; Increase in police custody of major rank officers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.