दिल्लीतील मेजर ‘किलारी’ने २५ लाखांत ‘थिरु’ला विकली होती लष्कराची प्रश्नपत्रिका

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 06:24 PM2021-03-30T18:24:10+5:302021-03-30T18:25:19+5:30

लष्कर रिलेशन भरती पेपरफुटी प्रकरण: तिघांना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी

Army Relations Recruitment Paper Leak Case: Major Killari from Delhi had sold question papers to 'Thiru' for Rs 25 lakh | दिल्लीतील मेजर ‘किलारी’ने २५ लाखांत ‘थिरु’ला विकली होती लष्कराची प्रश्नपत्रिका

दिल्लीतील मेजर ‘किलारी’ने २५ लाखांत ‘थिरु’ला विकली होती लष्कराची प्रश्नपत्रिका

Next

पुणे : दिल्लीतील मेजर वसंत किलारी याने तामिळनाडुतील मेजर थिरु थंगवेल याला २५ लाख रुपयांच्या बदल्यात लष्कराचा पेपर पाठविला असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. न्यायालयाने अधिक तपासासाठी तिघांना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 

मेजर वसंत विजय किलारी (वय ४५, रा. दिल्ली, मुळ गाव आंध्र प्रदेश), मेजर थिरु मुरुगन थंगवेलु (वय ४७, रा. वेलिंग्टन, तामिळनाडु) आणि भारत लक्ष्मण अडकमोळ (वय ३७, रा. पाचोरा, जि. जळगाव) यांना येरवडा कारागृहातून ताब्यात घेऊन विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात अटक केली. महेंद्र सोनवणे, अलीअख्तर खान हे एक्स सर्व्हिसमन तसेच आजाद खान हा सैन्यात कुक आहे. किशोर गिरी याला सैन्याची भरती परिक्षेची कार्यपद्धती माहिती आहे.

तो पुणे, बारामती, फलटण, वडुज, इस्लामपूर, भुईज, पुसेगाव, रहमतपूर, कराड, सोलापूर, हातकणंगले, कोल्हापूर, सांगली, बेळगाव या ठिकाणी रिक्रुटमेंट अ‍ॅकॅडमी चालवत आहे. तसेच त्याने फ्रेंचायजी दिल्या आहे.  परीक्षेचे पेपर परीक्षेच्या एक दिवसांपूर्वी देतो, असे सांगून किशोर गिरी त्यांना प्रत्येकी ५ लाख रुपये फी आकारतो.

भारत अडकमोळ याला मेजर थिरु थंगवेल याच्याकडून रिलेशन भरती प्रश्नपत्रिका व्हॉटसअ‍ॅपवर पाठविली होती. थिरु थंगवेल याला दिल्लीतील मेजर वसंत किलारी याने ती प्रश्नप्रत्रिका पाठविली होती. किलारी याला पवन नायडु याने ती पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 
पवन नायडु हा व्यावसायिक असून तो गुन्हा घडल्यापासून फरार आहे. त्याला लष्करातून ही प्रश्नपत्रिका कोणी पाठविली, त्याचा तपास सुरु आहे. 
परीक्षेला बसणार्‍या परिक्षार्थींकडून त्यांनी प्रत्येकी १ लाख रुपये घेतले आहेत. 

थिरु थंगवेलु याने आर्मी रिलेशन भरती प्रक्रिेयेच्या लेखी परिक्षेची प्रश्नपत्रिका देण्याच्या बदल्यात वसंत किलारी याला रोख २५ लाख रुपये देण्याच ठरले होते. त्यानुसार वसंत किलारी याने थिरु थंगवेल याला प्रश्नप्रत्रिका पाठविली. थिरु याने ती अडकमोळ याला पाठविली. अडकमोळ याने ती इतरांना पाठविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. वसंत किलारी याला पवन नायडु याने ही प्रश्नप्रत्रिका पाठविली होती. नायडु हा फरार असल्याने त्याला ही प्रश्नप्रत्रिका कोणी पाठविली होती, याचा शोध सुरु आहे. 
तपासादरम्यान, पुंडलीक सहाणे (रा. श्री ओम साई करीअर अ‍ॅकॅडमी, वडाची वाडी) व अरंविद चव्हाण (रा़ महाड) यांचाही त्यात सहभाग असल्याचे समोर आले आहे. अटक आरोपींशी त्यांनी संगनमत करुन हा गुन्हा केला आहे.

सातारा येथील एका प्रशिक्षार्थीने दिलेल्या फिर्यादीवरुन विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. या प्रशिणार्थीने दिलेल्या १ लाख रुपयांपैकी १० हजार रुपये महेंद्र सोनवणे याच्याकडून जप्त करण्यात आले आहेत. उर्वरित ९० हजार रुपये हस्तगत करायचे आहेत. न्यायालयाने तीनही आरोपींना ५ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे. 

पुणे पोलीस आर्मी रिलेशन परीक्षेतील पेपरफुटीच्या तपासात एक एक गुंता सोडवित प्रश्नपत्रिका सर्वप्रथम कोणी फोडली, या दिशेने जात आहे. त्यातूनच व्यावसायिक पवन नायडुपर्यंत धागेदोगे पोहचले असून त्याच्याकडे ही प्रश्नपत्रिका कोणी पाठवली, याचा शोध सुरु आहे. 

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस आयुक्त लक्ष्मण बोराटे अधिक तपास करत आहेत.

Web Title: Army Relations Recruitment Paper Leak Case: Major Killari from Delhi had sold question papers to 'Thiru' for Rs 25 lakh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.