Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक

By ऑनलाइन लोकमत | Published: December 10, 2021 02:58 PM2021-12-10T14:58:39+5:302021-12-10T17:15:39+5:30

आज सायबर पोलीस ठाणात काही परीक्षार्थींनी क गट पेपरफुटी बाबत तक्रार दिली...

arogya bharti paper leak case cyber police arrested 2 students prashant badgire | Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक

Arogya Bharti: बडगिरेने आरोग्य भरती परीक्षेच्या प्रश्नपत्रिका ज्या विद्यार्थ्यांना विकल्या त्यांना पोलिसांनी केली अटक

googlenewsNext

पुणे: आरोग्य भरती पेपरफुटी प्रकरणी पोलिसांनी अजून दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. लातूर सार्वजनिक आरोग्य विभागाचा मुख्य प्रशासकीय अधिकारी प्रशांत बडगिरेने ज्या विद्यार्थ्यांना पेपर दिले होते त्या दोघांना अटक केली आहे. यामध्ये नामदेव विक्रम कारंडे (वय ३१, बीड ), उमेश वसंत मोहिते (वय २४ उमरगा, उस्मानाबाद) या दोघांना सायबर पोलिसांनी अटक केली आहे.

काही दिवसांपूर्वी आरोग्य विभागाचा पेपर आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनीच इतरांच्या मदतीने फोडल्याचे सायबर पोलिसांनी केलेल्या तपासात निष्पन्न झाले होते. बडगिरेने ज्या विद्यार्थ्यांना पैसे घेऊन पेपर दिले होते त्या दोघांना अटक करण्यात आली आहे. पेपरफुटीप्रकरणी राज्यातून अटक केलेल्यांची संख्या आता १४ वर गेली आहे.  बीड जिल्हा आरोग्य विभागात कामाला असणाऱ्या एका महिलेचा नामदेव हा नातेवाईक आहे.

आरोग्य विभागाच्या गट ड चा पेपर फुटला. त्याप्रमाणेच गट क चा पेपर फुटला असल्याचा संशय असल्याचे लोकमतने प्रकाशित केले ते. आज सायबर पोलीस ठाण्यात काही परीक्षार्थींनी क गट पेपरफुटी बाबत तक्रार दिली. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला असून, ते पडताळून तपास करण्यात येणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डी. एस. हाके यांनी सांगितले. महेश बोटले या गट 'क' व गट 'ड' या पदाचे भरतीचे लेखी परिक्षेचा पेपर समितीचा सदस्य आहे. त्याने गट ड शिवाय इतर गटाचे भरती परिक्षेमध्ये आणखी कोणत्या एजंटांना त्या परिक्षेचे पेपर्स वितरीत केले आहे का याचा तपास करणार आहे.

Web Title: arogya bharti paper leak case cyber police arrested 2 students prashant badgire

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.