आरोग्यवर्धिनी २९ केंद्र लवकरच सुरू होणार; केंद्रासाठी ९६ पैकी २५ जागा उपलब्ध होणार
By राजू हिंगे | Published: November 1, 2023 07:28 PM2023-11-01T19:28:13+5:302023-11-01T19:28:31+5:30
सिंहगड रस्त्यावरील दोन, कोंढवे धावडे, शिवणे, हडपसर, कोथरूड, कोंढवा, बावधन आणि धनकवडी येथील प्रत्येकी एक यासह २९ केंद्रे सुरू करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण
पुणे : महापालिकेतील समाविष्ट ३४ गावांमधील आरोग्य सुविधा वाढविण्याच्या दृष्टीने १२५ पैकी २९ आरोग्यवर्धिनी केंद्रे उभारण्यात आली आहे. ही केद्र लवकरच सुरू होणार आहेत. दुस०या टप्पातील ९६ पैकी २५ आरोग्यवर्धिनी केद्रासाठी जागा उपलब्ध झाली आहे. उर्वरित ठिकाणी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
शहरात महापालिकेचे कमला नेहरू रुग्णालय तसेच नायडू रुग्णालय, ५४ दवाखाने आणि १९ प्रसूतीगृहे कार्यान्वित आहेत. मात्र, उपनगरांमधील नागरिकांना प्राथमिक उपचारांसाठी दर वेळी शहरात येणे शक्य नसते. अशा वेळी आरोग्य सुविधा निर्माण होण्यासाठी राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानांतर्गत आरोग्यवर्धिनी केंद्र सुरू करण्यात येत आहेत. एका आरोग्यवर्धिनी केंद्रात एक डॉक्टर, दोन नर्स, एक ड्रेसर आणि एक फार्मासिस्ट यांची नेमणूक करण्यात येणार आहे. सिंहगड रस्त्यावरील दोन, कोंढवे धावडे, शिवणे, हडपसर, कोथरूड, कोंढवा, बावधन आणि धनकवडी येथील प्रत्येकी एक यासह २९ केंद्रे सुरू करण्याची सर्व प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
५८ ठिकाणी आपला दवाखाना
शहरातील ३० हजार लोकसंख्येच्या मागे १ आपला दवाखना सुरू करण्यात येणार आहे. त्यानुसार ५८ ठिकाणी कंटनेर स्वरूपात आपला दवाखना सुरू केला जाणार आहे. त्यासाठी पालिकेची प्रशासकीय पातळीवर तयारी सुरू आहे.
आरोग्यवर्धिनीची २९ केद्र लवकर सुरू करण्यात येणार आहे. दुस०या टप्पातील ९६ पैकी २५ आरोग्यवर्धिनी केद्रासाठी जागा उपलब्ध झाली आहे. उर्वरित ठिकाणी जागा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.. - डॉ. भगवान पवार , आरोग्यप्रमुख, पुणे महापालिका