Pune Bypoll Election 2023: कसब्यामध्ये ५०.०६ टक्के, चिचंवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 10:50 PM2023-02-26T22:50:10+5:302023-02-26T22:50:52+5:30

Pune Bypoll Election 2023: कसबा पेठ आणि चिंचवड मतदारसंघात दुपारनंतर मतदारांचा उत्साह दिसून आल्याचे सांगितले जात आहे.

around 50 percent voting for kasba peth and 50 47 percent voting for pimpri chinchwad in bypoll election 2023 | Pune Bypoll Election 2023: कसब्यामध्ये ५०.०६ टक्के, चिचंवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान

Pune Bypoll Election 2023: कसब्यामध्ये ५०.०६ टक्के, चिचंवडमध्ये ५०.४७ टक्के मतदान

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पुणे : कसबा आणि चिचंवड विधानसभेच्या पोटनिवडणुकीसाठी मारहाणीचे किरकोळ अपवाद वगळता शांततेत मतदान झाले. कसब्यामध्ये ५०.०६ टक्के तर चिचंवड मध्ये ५०.४७ टक्के मतदान झाले. या दोन मतदारसंघातील दिग्गज उमेदवाराचे भवितव्य ईव्हीएम मशिन मध्ये बंद झाले. या निवडणुकीची मतमोजणी येत्या गुरूवारी दि.२ होणार असुन निकालाची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
कसब्यात महाविकास आघाडीचे रवींद्र धंगेकर व महायुतीचे हेमंत रासने यांच्यात थेट ,तर चिंचवडमध्ये महायुतीच्या अश्विनी जगताप आणि महाविकास आघाडीचे नाना काटे आणि अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांच्यात तिरंगी लढत झाली. या दोन्ही ठिकाणी सकाळी सात वाजल्यापासुन दुपारी १ वाजेपर्यत संथगतीने मतदान सुरू होते. दुपारी १ नंतर मतदानांची टक्केवारी वाढली. त्यानंतरच्या चार तासात मतदान वाढले.

गंजपेठेत राडा

कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत पैशांचे पाकीट न घेतल्याच्या कारणावरून भाजपचे माजी नगरसेवक व त्यांच्या साथीदारांनी एका कुटुंबाला बेदम मारहाण केली. यावरून गंजपेठेत शनिवारी रात्री जोरदार राडा झाला. मध्यरात्रीपर्यंत दोन्ही गटातील लोक गंजपेठ पोलिस चौकीसमोर ठाण मांडून बसले होते. पोलिसांनी दोन्ही गटांतील २५ ते ३० जणांवर गुन्हा दाखल केला. मतदानाच्या दिवशी भाजपचे माजी नगरसेवक गणेश बिडकर यांनी पैसै वाटपकरण्यात आल्याचा आणि काँग्रेस कार्यकर्त्याला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला. या घटना वगळता कसब्यात शांततेत मतदान झाले.

पोटनिवडणुकीला गालबोट

पिंपळे गुरव मतदान केंद्रावर अंघोळकर आणि राहुल कलाटे यांचे समर्थक एकमेकांना भिडले. दोन्ही समर्थकांमध्ये धक्काबुक्की आणि बाचाबाची झाली. त्यामुळे मतदान केंद्रावर तणावग्रस्त वातावरण निर्माण झालं आहे. पोलिसांच्या मध्यस्थीनंतर समर्थकांमधील वाद मिटला.

मतदानाचा टक्क घटला

विधानसभेच्या २०१९च्या निवडणुकीत कसबा मतदारसंघामध्ये ५१.५४ तर चिंचवड मतदारसंघात ५५.८८ टक्के मतदान झाले हाेते. पण आता पोटनिवडणुकीत कसब्यात ५०.०६ टक्के आणि चिचंवड मध्ये ५०.४७ टक्के मतदान झाले आहे. या दोन्ही ठिकाणी घटलेल्या टक्केवारीचा फायदा कुणाला होणार यावर तर्कविर्तक लढविले जात आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

Web Title: around 50 percent voting for kasba peth and 50 47 percent voting for pimpri chinchwad in bypoll election 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.