अवसरीत रंगला कुस्त्यांचा आखाडा
By admin | Published: April 19, 2017 04:09 AM2017-04-19T04:09:57+5:302017-04-19T04:09:57+5:30
आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात रंगलेल्या चितपट कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले.
अवसरी : आंबेगाव तालुक्याच्या पूर्व भागातील अवसरी बुद्रुक येथे भैरवनाथ यात्रेनिमित्त आयोजित कुस्त्यांच्या आखाड्यात रंगलेल्या चितपट कुस्त्यांनी कुस्तीशौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. आठ चांदीच्या ढाली व रोख रक्कम देऊन पैलवानांना सन्मानित करण्यात आले. दोनशेपेक्षा जास्त पैलवान सहभागी झाले होते.
अवसरी बुद्रुक येथे कुस्त्यांचा आखाडा पार पडला. खेड, जुन्नर, आंबेगाव, पारनेर, शिरूर तालुक्यातून या आखाड्यात मल्लांनी सहभाग घेतला होता. या वेळी पुणे जिल्हा
दूध संघाचे अध्यक्ष विष्णू काका
हिंगे, पंचायत समिती सदस्य
रवींद्र करंजखेले, उपसरपंच किशोर हिंगे, माजी सरपंच बाळासाहेब हिंगे, अशोक योगिराज हिंगे, अनिल हिंगे, कल्याण हिंगे, अजित हिंगे, संजय चव्हाण, शांताराम बापू हिंगे, निवृत्ती फल्ले, सागर हिंगे, डॉ. संदीप हिंगे, गोकुळ बाणखेले, गेणभाऊ हिंगे-पाटील आदींसह परिसरातील कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आठ चांदीच्या ढाली व रोख रक्कम देऊन पैलवानांना सन्मानित करण्यात आले. चितपट कुस्त्यांमुळे शौकिनांच्या डोळ््यांचे पारणे फिटले. प्रेक्षक टाळ्या-शिट्या वाजवून दाद देत होते. अक्षय शेटे, अविनाश शेटे, आनंद हिंगे या पैलवानांच्या कुस्त्या प्रेक्षकांची दाद मिळवून गेल्या. सर्वात शेवटी कुस्ती ११ हजार रुपये इनामासाठी झाली. कुस्तीचे मानकरी प्रशांत दौलत हिंगे, सागर वसंतराव हिंगे ठरले. आखाड्याची व्यवस्था अवसरी ग्रामस्थांनी पाहिली. कल्याण हिंगे आणि अशोक हिंगे यांनी सूत्रसंचालन केले.(वार्ताहर)